
स्टार प्रवाहच्या ‘शतदा प्रेम करावे’ या लोकप्रिय मालिकेत एकट्विस्ट आला आहे. या मालिकेतल्या सायली या भूमिकेत स्नेहाशहाच्या ऐवजी ज्ञानदा रामतीर्थकर ही अभिनेत्री दिसणार आहे.अल्लड, अवखळ असलेली सायली ही भूमिका ज्ञानदा कशीसाकारणार हे पहावं लागेल.
अल्लड प्रेमाची अबोल गोष्ट ‘शतदा प्रेम करावे’ या मालिकेतउलगडली आहे. या मालिकेनं अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनातघर केलं आहे. उन्मेष आणि सायली यांच्या नात्याला आताप्रेमाची किनार लाभते आहे. त्या दोघांमध्ये हळवं नातं निर्माणहोऊ लागलं आहे. मात्र, सायलीची भूमिका साकारणारी स्नेहाशहा काही कारणानं या मालिकेत काम करू शकणार नाही.तिची जागा आता अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर घेत आहे. यामालिकेतून ज्ञानदाचं स्टार प्रवाहवर पदार्पण होत आहे.
सायलीची भूमिका साकारण्याविषयी ज्ञानदा म्हणाली, “शतदाप्रेम करावे’ची कथा खूपच इंटरेस्टिंग आहे. अभिजित साटम,अमिता खोपकर, प्रिया मराठे हे माझे आवडते कलाकार आहेत.त्याच मालिकेसाठी मला विचारणा झाल्यावर मी लगेच होकारदिला. सायलीच्या भूमिकेलाही खूप कंगोरे आहेत. त्यामुळे हीभूमिका करायलाही नक्की मजा येईल. या भूमिकेसाठी मी खूपएक्सायटेड आहे. स्टार प्रवाहच्या ‘अग्निहोत्र’ आणि ‘राजाशिवछत्रपती’ या मालिका मी नियमितपणे पहायचे. ‘शतदा प्रेमकरावे’चं टायटल साँग मला प्रचंड आवडलं. स्टार प्रवाहबरोबरकाम करायला मिळावं अशी इच्छाही होतीचशतदा प्रेम करावे’च्या रुपानं ती पूर्ण होत आहे. यासाठी स्टार प्रवाहचे आणि सोबाफिल्म्सचे अनेक आभार.”
उन्मेष आणि सायलीच्या नात्याचं पुढे काय होणार आणिसायलीची भूमिका ज्ञानदा कशी साकारणार हे जाणून घेण्यासाठीन चुकता पहा ‘शतदा प्रेम करावे’ सोमवार ते शनिवार रात्री ८:00वाजता फक्त स्टार प्रवाहवर!
Leave a Reply