
कोल्हापूर : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त कोल्हापूर शहरात विविध चौकांत रात्री बारा वाजता आंबेडकर प्रेमींनी एकत्रित येऊन जयंती साजरी करण्यास सुरुवात केली.यानिमित्त दसरा चौक, बिंदू चौक येथे हजारोंच्या संख्येने आंबेडकर प्रेमींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून जयंतीस सुरुवात केली. तसेच शांततेच्या व समतेच्या मार्गाने जयंती साजरी करावी असा संदेशही या वेळी देण्यात आला. १९२७ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दल ही संघटना आजही कार्यरत आहे. या संघटनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिबा फुले यांना संचलन करून मानवंदना देण्यात आली.यावेळी अनेकांनी बहुजनांना समाजात सन्मान मिळवून देणारे शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्या वेशभूषा परिधान केल्या होत्या. यावेळी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून विविध संघटनांनी जयंती शांततेच्या मार्गाने साजरी करावी असे आवाहन केले आहे.
Leave a Reply