अभूतपूर्व उत्साहात जीतोची रॅली ;गिनिस बुक ऑफ वर्ल्डमध्ये नोंद

 

कोल्हापूर : जीतोच्या वतीने आज काढण्यात आलेल्या जितोच्या रॅलीला प्रचंड सळसळत्या उत्साहात स्पर्धकांनी प्रतिसाद दिला. त्याचबरोबर या स्पर्धेची गिनिस बुक ऑफ वर्ल्डने दखल घेतली.जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जीतो) च्या वतीने जगभरात भगवान महावीरांची बहुमोल उपदेश अहिंसा आणि शांततेचा प्रसार होण्यासाठी २ एप्रिलला अहिंसा रॅलीचे आयोजन केले होते. देशभरामध्ये ६५ शहरांमध्ये ही रॅली निघाली. इतक्या मोठ्या प्रकारचा देशातील हा पहिला उपक्रम असल्याने त्याची नोंद लिम्का बुक आणि गिनिस बुक ऑफ वर्ल्डने घेतली.

दरम्यान, कोल्हापुरात तीन, पाच आणि दहा किलोमीटर अशी रॅली निघाली. अलंकार हॉलपासून धैर्यप्रसाद हॉल ते कसबा बावडा येथील सेवा हॉस्पिटल पुढे व परत असा मार्ग असणाऱ्या या रॅलीसाठी स्पर्धकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला होता. जैन सोशल ग्रुप, डीवायपी ग्रुप, रग्गेडियन ग्रुप, सकल जैन समाजबरोबर इतरही सर्व समाजातील लोकांनी यामध्ये सहभाग घेतला. सहा वाजता स्पर्धेला सुरवात झाली. मालोजीराजे छत्रपती, सौ. मधुरिमाराजे छत्रपती, संजय घोडावत, ज्येष्ठ दिग्दर्शक महेश मांजरेकर, आमदार ऋतुराज पाटील, अप्पर पुलिस अधीक्षक जयश्री देसाई यांच्या हस्ते तीन गटांतील स्पर्धांना सुरवात करण्यात आली. स्पर्धकांना प्रमाणपत्र, पदक देण्यात आले.

स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी जीतो अध्यक्ष गिरीश शहा, नेमचंद संघवी, रोमचे कन्व्हेनर जितेंद्र राठोड, चीफ सेक्रेटरी अनिल पाटील, ट्रेझरर रमणलाल संघवी, राजीव पारीख, हर्षद दलाल, अतुल शहा, आशीष कोरगावकर, सुरेंद्र जैन, युवराज ओसवाल, शीतल कोरडे, जयेश ओसवाल, लेडीज विंग चेअरमन श्रेया गांधी, सेक्रेटरी माया राठोड, आरती संघवी, वैशाली संघवी, पायल पोरवाल, स्विटी पोरवाल, यूथ विंगचे चिंतन राठोड, चिन्मय कर्नावट, अक्षत शहा, पुनित कोठारी, आकाश राठोड, रितीका पाटील, शुभम ओसवाल, अभिषेक गांधी यांनी विशेष परिश्रम घेतले.स्पर्धेमध्ये आबालवृद्धांसह सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद होता. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांनी जसा तीन गटात प्रतिसाद दिला त्याप्रमाणे तीन किलोमीटरमध्ये एक पालक आपल्या पाच वर्षांच्या मुलीला घेऊन धावताना त्यांचा फोटो घेण्याचा मोह सर्वांना झाला.तीनही गटातील स्पर्धकांनी झुंबा डान्सचा मनमुराद आनंद लुटला तसेच कित्येक खेळाडूंनी पदकासह सेल्फीच्या माध्यमातून आपापले फोटो घेतले.जीतोच्या वतीने आयोजित या रॅलीचे उत्कृष्ट असे नियोजन करण्यात आले. अगदी पहाटे पाच वाजता पार्किंग, खेळाडूंची नोंदणी, कीट वाटप, स्पर्धा सुरू करणे, पदक वितरण ते स्पर्धा झाल्यानंतर सर्वांना अल्पोपहार मिळेल याकडे समन्वयकांनी लक्ष दिले.स्पर्धेमध्ये महिलांचीही संख्या लक्षणीय अशी होती. तीन गटात भाग घेऊन महिलांनी स्पर्धा पूर्ण केली. त्याचबरोबर नियोजनातही भाग घेऊन स्पर्धा यशस्वी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!