
कोल्हापूर : भारत देशात साखर उद्योग क्षेत्राला जास्त महत्व दिले जाते. देशाचे अर्थकारण हे साखर उद्योगावर अवलंबून आहे. पण या क्षेत्रामध्ये डिजिटलायझेशन झालेले नाही. हीच गोष्ट लक्षात घेवून चीनिमांडीच्या संचालकांनी वेब बेस इन्फर्मेशन पोर्टल सुरु केले असल्याची माहिती देण्यात आली.
चीनिमांडीच्या संचालकांनी ३० ते ३५ वर्ष या क्षेत्रात काम केल्यानंतर सर्वसामान्य लोकांना सरळ सध्या आणि सोप्या भाषेत माहिती मिळावी. नवीन तंत्रज्ञान अवगत होऊन त्याचा फायदा व्हावा हा हेतूने www.chinimandi.com हे इन्फर्मेशन पोर्टल सुरु करण्यात आले आहे. साखर उद्योगाविषयी माहिती देणारे हि भारतातील पहिली कंपनी आहे.
या पोर्टलवर साखर, कारखानदार, शेतकरी या क्षेत्रातील न्यूज, साखर उद्योग क्षेत्रातील शेअर बाजार संबंधी मार्केट उपडेट, पब्लिक पोल, ग्व्हर्मेट नोटिफिकेशन, शुगर डिरेक्टरी, शुगर प्राईज, राष्ट्रीय व अंतराष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रम विषयी सर्वमाहिती या पोर्टलवर देण्यात आली आहे. यावरील सर्व माहिती मोफत असून याचा लाभ घ्यावा असे आवाहन कंपनीच्यावतीने करण्यात आले आहे.
Leave a Reply