
कोल्हापूर : ख्रिश्चन समाजाला दफनभूमीसाठी जागा मिळावी, अशी अनेक वर्षांची ख्रिश्चन समाज आणि संघटनांची मागणी आहे. याकरिता आंदोलनेही झाली. ख्रिश्चन समाजाच्या दफनभूमीसाठी ब्रम्हपुरी येथील जागा आरक्षित करण्यात आली होती परंतु सदर ठिकाणी अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे ख्रिश्चन समाजाच्या दफनभूमीसाठी महानगरपालिका अखत्यारीतील एक एकरहून अधिक क्षेत्र असणाऱ्या जागांची यादी तयार करावी. दफनभूमीसाठी योग्य असणाऱ्या जागांची पाहणी करुन तात्काळ जागा उपलब्ध करुन द्यावी, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी तथा आयुक्त श्री.राहुल रेखावार यांना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालय येथे पार पडलेल्या बैठकीत ख्रिश्चन समाज दफनभूमीसह राजाराम बंधारा पर्यायी पुलाचे काम आणि प्रयाग चिखली येथील श्री दत्त मंदिर सुशोभिकरण विकासाच्या कामाचा आढावा घेतला.यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष .राजेश क्षीरसागर यांनी, ख्रिश्चन समाजासाठी सध्या कोल्हापूर महानगरपालिका हद्दीमध्ये कदमवाडी आणि शिवाजी पार्क या दोन ठिकाणी दफनभूमी आहे. ही जागा दफनभूमीसाठी अत्यंत अपुरी पडत आहे. ख्रिश्चन बांधवांची गैरसोय टाळण्यासाठी त्यांना दफनभूमीसाठी लवकरात लवकर जागा उपलब्ध करुन द्यावी, अशा सूचना राजेश क्षीरसागर यांनी दिल्या.
Leave a Reply