
कोल्हापूर: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने ऐतिहासिक शिवाजी पुतळा चौकामध्ये जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सनदशीर मार्गाने मराठा समाजासाठी आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलन कर्त्यावर झालेल्या लाठी हल्ल्याचा व मंत्री नामदार छगन भुजबळ यांच्या बेताल वक्तव्याचा निषेध करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी.पाटील व शहराध्यक्ष आर. के. पोवार यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी एक तास धरणे आंदोलन करण्यात आले.यावेळी जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील यांनी मराठा समाजावर जो लाठी चार्ज करण्यात आला याला सर्वस्वी गृहमंत्री व हे सध्याचे राज्य सरकार जबाबदार असून आज राज्यांमध्ये संपूर्ण मराठा समाज एकवटला असून महाराष्ट्राला अस्वस्थ करणाऱ्या गृहमंत्र्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा अशी मागणी करण्याबरोबरच मराठा समाजाला त्वरित आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करावेत असे सांगितले. त्याचबरोबर शासनाचे मंत्री नामदार छगन भुजबळ यांनी पवार साहेबांच्या वर बोलताना मर्यादा पाळाव्यात अन्यथा त्याची किंमत मोजावी लागेल असे सांगितले. तसेच पक्ष फोडण्याचे पाप करणाऱ्या त्या नऊ गद्दार मंत्र्यांचा धिक्कार असून मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार बद्दल बोलताना तोंड आवरून बोलावे अन्यथा त्यांना कोल्हापूरी हिसका दाखवू अशा शब्दात तीव्र निषेध केला.तसेच यावेळी बोलताना शहराध्यक्ष आर.के. पोवार यांनी मराठा समाजाचा अंत न पाहता मध्यम मार्ग काढावा आणि मराठा समाजाच्या शिष्टमंडळाची बैठक घ्यावी जो लाठीचार्ज झाला आहे हा पूर्वनियोजित होता यासाठी सर्व जबाबदार अधिकाऱ्यांच्या वर निलंबनाची कारवाई करावी तसेच राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्यावर चुकीच्या पद्धतीने टीका करून नामदार छगन भुजबळ यांनी आपल्या कोणत्या बुद्धीचे दर्शन घडवले आहे. २५ वर्षे पवार साहेबांच्या जीवावर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्रीपद भूषवण्याची संधी मिळून देखील लाचार होऊन भाजपच्या वळचणीला गेलेल्या भुजबळ यांनी याद राखावे व आम्हालाही बोलता येते याचे भान ठेवावे.सर्वांनी जालन्या मधील मराठा समाजावर झालेल्या लाटी हल्ल्याच्या जाहीर निषेध केला त्याचबरोबर भुजबळांचा देखील खरपूस समाचार घेतला व भुजबळ यांनी मर्यादित रहावे असे सुनावले.यावेळी राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भुजबळांच्या प्रतिमेला पायातील जोडे मारून आपला रोष व्यक्त केला.यावेळी महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी माने, शहराध्यक्ष पद्मा तिवले, अनिल घाटगे, सुनील देसाई, निरंजन कदम, नितीन भाऊ पाटील, सरोजनी जाधव, किसनराव कल्याणकर, जयकुमार शिंदे, फिरोज सरगुर, महादेव पाटील, शितल तिवडे, गणेश जाधव, अमोल जाधव, हिदायत मणेर, बाबा जगताप सादिक आत्तार, नितीन मस्के, रियाज कागदी, नागेश फरांडे, फिरोज खान उस्ताद, सुमन वाडेकर, अंजली पोळ, रामराजे बदाले, रेहना नागरकट्टी, सलीम मुल्ला, अरुणा पाटील, राजेंद्र ओंकार, प्रकाश पांढरे, लहू शिंदे, सुवर्णा शिंदे,संदीप साळोखे, नागेश जाधव, दीपक लोहार,पप्पु जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्ते व महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply