भुदरगड तालुक्यात काँग्रेसच्या जनसंवाद पदयात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद 

 

गारगोटी : आमदार सतेज पाटील यांच्या काॅंग्रेस जनसंवाद पदयात्रेस भुदरगड तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गारगोटी – कूर मार्गावर काॅंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी, महिलांनी औक्षण करत मोठ्या उत्साहात स्वागत केले. पदयात्रेत 94 वर्षीय माजी आमदार दिनकरराव जाधव सहभागी झाले होते.सकाळी साडेसात वाजता गारगोटीतील ज्योतिर्लिंग मंदिरापासून पदयात्रेचा प्रारंभ झाला. आमदार सतेज पाटील यांनी हुतात्मा क्रांती स्मारक पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.भेटीदरम्यान त्यांनी ज्येष्ठांना भेटून संवाद साधला.गारगोटीहून ही पदयात्रा खानापूर, कलनाकवाडी, मडिलगे खुर्द, मडिलगे बुद्रुक, कूर येथे आली. येथे ग्रामस्थांनीपदयात्रेचे उत्साहात स्वागत केले. कुर येथे जाहीर सभेने भुदरगड तालुक्यातील काँग्रेस जनसंवाद पद यात्रेची सांगता झाली.या जनसंवाद पदयात्रेत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शामराव देसाई, जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील, माजी उपसभापती सत्यजित जाधव सचिनदादा घोरपडे, युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष संजयसिंह सरदेसाई, बिद्री कारखान्याचे माजी संचालक प्रकाश देसाई, आर. व्ही. देसाई, एस. एम‌ पाटील, दिनकरराव कांबळे, बाबासो देसाई, राजू काझी, भुजंगराव मगदुम, प्रताप वारके, सुरेश नाईक, अमोल पाटील, अमर बरकाळे, तालुकाध्यक्षा शुभांगी जाधव, गारगोटी शहराध्यक्ष अनुराधा चव्हाण, सपना गोजारे, सविता वर्णे आदींसह तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!