

स्माईल फाउंडेशन अखत्यारीत देण्यात येणारा हा पुरस्कार दादासाहेब फाळके यांच्या कुटुंबियांकडून चित्रपटसृष्टीतील यशस्वी कलाकारांना त्यांच्या कामगिरीसाठी देण्यात येतो. त्यानुसार यावर्षीचा हा मान ‘लपाछपी’ सिनेमातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुजाला मिळाला.
केवळ भारतातूनच नव्हे तर, जगभरातून ‘लपाछपी’ आणि पुजा सावंतच्या अभिनयाची दखल घेतली जात आहे. ‘श्रावणक्वीन’ झाल्यानंतर पुजा सावंतने ‘क्षणभर विश्रांती’ या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. ‘क्षणभर विश्रांती’ या तिच्या पहिल्याच चित्रपटात तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. यानंतर झकास, सतरंगी रे, पोस्टर बॉईज , निळकंठ मास्टर, दगडी चाळ, भेटली तु पुन्हा, लपाछपी या चित्रपटात तिने आपले अभिनय कौशल्य दाखविले. नैसर्गिक अभिनय आणि सौंदर्याच्या बळावर पूजाने मराठी चित्रपटसृष्टीत आपले विशेष स्थान निर्माण केले असून, तिच्या चाहत्यांची संख्यादेखील दिवसागणिक वाढत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते.
Leave a Reply