
कोल्हापूर: अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आणि चित्पावन संघातर्फे बुधवारी भगवान परशुराम, छत्रपती शिवराय आणि महात्मा बसवेश्वर जयंतीनिमीत्त पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी ७ वाजता बिनखांबी परिसरातील गुरूमहाराज वाडा येथुन या पालखी सोहळ्यास प्रारंभ होऊन महाद्वार रोड, जोतिबा रोड, अंबाबाई मंदिर या मार्गाने ही पालखी निघाली. भाविकांची पालखीचे दर्शनासाठी गर्दी झाली होती.ढोल ताशा च्या गजरात ही पालखी निघाली.
दरम्यान परशुराम जयंतीनिमीत्त चित्पावन संघातर्फे बुधवारी दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये सकाळी महापुजा, सामुदायीक मंत्रपठण, महिला मंडळाचे भजन यासह अनेक धार्मिक विधी पार पडले. शहरातील समस्त ब्राह्मण संघटनांचे पदाधिकारी यांनी बुधवारी सकाळी कत्यायनी येथील भगवान परशुराम मंदिरात जाऊन अभिषेक घातला.यावेळी महासंघाचे शाम जोशी, नंदकूमार मराठे, प्रसाद कुलकर्णी उपस्थित होते.
Leave a Reply