
कोल्हापूर: क्रिडाई कोल्हापूरच्या वतीने ९ ते ११ फेब्रुवारी या कालावधीत पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठे ‘दालन २०२४’ हे बांधकामविषयक प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. याच्या मंडप उभारणीचा प्रारंभ शुक्रवारी आर्या स्टील्स रोलिंग इंडिया प्रायव्हट लिमिटेडचे संचालक अशोक बन्सल आणि क्रिडाईचे अध्यक्ष के. पी. खोत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात दालनचे चेअरमन चेतन वसा यांची प्रमुख उपस्थिती होती. ग्राऊंड समितीचे अध्यक्ष पवन
जामदार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी प्रमोद साळुंखे, अतुल पोवार, संग्राम दळवी, लक्ष्मीकांत चौगुले, गणेश सावंत, संदीप पोवार, निखिल शहा, विश्वजित जाधव, प्रदीप भारमल, सत्यजित मोहिते, राजीव परीख उपस्थित होते. संदीप मिरजकर यांनी आभार मानले. महासैनिक दरबारच्या मैदानावर झाला.
Leave a Reply