
कोल्हापूर:डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाने संशोधन क्षेत्रात दमदार पाऊल टाकले असून महाविद्यालयाच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यानी केलेल्या संशोधनामुळे महाविद्यालयाला 22 पेटंट प्राप्त झाली आहेत. महाविद्यालयाकडून होणाऱ्या संशोधनाचा उपयोग समाजासाठी व्हावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन डी. वाय. पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजय डी.पाटील यांनी केले..डॉ. संजय डी. पाटील म्हणाले, डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाने विद्यार्थी आणि प्राध्यापकाना संशोधनासाठी नेहमीच व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. हे संशोधन समाजभिमुख तसेच उद्योग विश्वाला उपयोगी असावे, त्याच बरोबरच आंतरशाखीय संशोधनाला चालना देणारे असावे याची काळजी महाविद्यालयाचे व्यवस्थापन व संशोधन विभाग नेहमी घेतो. भविष्यामध्येही महाविद्यालय जनरलमधील प्रकाशन,पेटंट समाजाला उपयोगी प्रकल्प, कन्सल्टन्सी या रूपाने संशोधन क्षेत्रामध्ये घोडदौड अबाधित राखेल. आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, उत्तम अभियंते, उत्तम नागरिक घडवताना कुशल संशोधक घडावेत यासठी आमचा नेहमीच प्रयत्न असतो. प्रात्यक्षिक व औद्योगिक ज्ञान देतानाच त्याचा उपयोग समाजासाठी व्हावा यावर आमचा विशेष भर असतो. विद्यार्थी व प्राध्यापकांनी केलेल्या या संशोधनाला पेटंटचे कोंदण मिळल्याने अतिशय समाधान वाटत आहे.
डॉ. संतोष चेडे, डॉ अमरसिंह जाधव, डॉ. सुनील रायकर, डॉ. मनीषा भानुसे, डॉ. कीर्ती महाजन, डॉ. विनायक पुजारी, डॉ. गणेश पाटील, डॉ, शंकर कोडते, अमृता भोसले, प्रकाश बगाडे, पल्लवी घोलप, शताक्षी कोकाटे, डॉ सुप्रिया पाटील, डॉ.तानाजीराव मोहिते-पाटील, डॉ.प्रशांत जगताप, तरुणा जाधव, स्वरूप यादव, पार्थ पाटील, आल्हाद देशपांडे, शुभम माने यांनी ही पेटंट मिळवण्यासाठी योगदान दिले. डॉ. संजय डी. पाटील व आमदार ऋतुराज पाटील यांच्याहस्ते या पेटंटधारकांचा सत्कार करण्यात आला. या नियोजनासाठी आयपीआर सेल समन्वयक सौ अमृता भोसले व महाविद्यालयाच्या संशोधन विभागाच्या संघाने विशेष परिश्रम घेतले.
Leave a Reply