
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापुरातील तपोवन मैदान येथे आयोजित सतेज कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाला चार दिवसात ८ लाख शेतकरी, नागरीक व ग्राहकांनी भेट दिली. आणि शेतीविषयक योजनांची माहिती घेऊन शेतीला लागणाऱ्या साहित्याची खरेदी केली. दरवर्षी या कृषी प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळतो.हा प्रतिसाद पाहून आणि शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी शेती साठी लागणारे साहित्य आणि माहिती मिळावी या उद्देशानेच आमदार सतेज पाटील यांनी या कृषी प्रदर्शनास सुरुवात केली यावर्षी २०२४ सालचे प्रदर्शन हे सहावे प्रदर्शन आयोजित केले होते.आज शेवटच्या दिवशी सोमवारी तपोवन मैदानावर जनसागर लोटला होता.चार दिवसात तांदळाची उंच्चांकी विक्री झाली असून ६० लाखांपेक्षा अधिक उलाढाल ही तांदूळ मधून झाली आहे.महिलां बचत गटांच्या खाद्य पदार्थ स्टॉलच्या माध्यमातून ५० लाखांची उलाढाल झाली आहे.तर शेतीसाठी लागणारी मोठी यंत्रे,व अवजारे खरेदी करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. सतेज कृषी प्रदर्शनात चार दिवसात तब्बल ९ कोटीची उलाढाल झाली आहे. विविध शेतीची साहित्य व यंत्रे मोठ्या प्रमाणात खरेदी झाली आहेत.शेतकऱ्यांना एकाच छताखाली नवनवीन शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी यासाठी आमदार सतेज पाटील यांनी गेली ५ वर्षांपासून या पश्चिम महाराष्ट्रातील भव्य अशा “सतेज कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाची सुरुवात केली.यावर्षीचे हे ६ वे प्रदर्शन २७ डिसेंबर रोजी सुरू झाले आज याची ३० डिसेंबर रोजी सांगता अभूतपूर्व गर्दीत झाली.चार दिवसात कोल्हापूर सह,सांगली,सातारा, सोलापूर, कर्नाटक,कोकण इचलकरंजी व कोल्हापूर जिल्ह्यातील आसपासच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी प्रचंड गर्दी कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी व शेती उपयुक्त साहित्य खरेदीसाठी केली होती.
समारोप प्रसंगी प्रकल्प संचालक जालिंदर पांगीरे, आत्मा प्रमुख रक्षा शिंदे पशुधन विकास अधिकारी जिल्हा परिषद प्रमोद बाबर, गोकुळ संचालक बाबासो चौगुले, सामाजिक कार्यकर्ते धीरज पाटील, शेतकरी नेतृत्व बाबासाहेब देवकर, कृषी विकास केंद्र समन्वयक जयवंत जगताप,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सुयोग वाडकर, डॉ,सुनील काटकर, बिद्री कारखाना संचालक आर.एस.कांबळे,कृषी प्रदर्शन संयोजक विनोद पाटील, सहयोगी संशोधन संचालक (एनएआरपी).डॉ.अशोक पिसाळ आदींच्या उपस्थितीत हस्ते विजेत्यांचा प्रशस्तीपत्र व ट्रॉफी व रोख बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला.
Leave a Reply