कोल्हापूर: डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त अशा ‘चाईल्ड फ्रेंडली’ प्रशस्त बालरोग विभागाचा शुभारंभ करण्यात आला. १०० बेडच्या या अत्याधुनिक बालरोग विभागाचे उद्घाटन विश्वस्त सौ. वैजयंती संजय पाटील आणि अॅडव्हायझर सौ. वृषाली पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी कुलपती डॉ. संजय डी. पाटील आणि विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.गेल्या २० वर्षांपासून डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांना मोफत अथवा अत्यंत माफक दरात दर्जेदार आरोग्य सुविधा पुरवल्या जात आहेत. रुग्णांना हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक उपचार मिळावेत यासाठी कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या पुढाकारातून हा प्रशस्त बालरोग विभाग साकार झाला आहे अशी माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ. वैशाली गायकवाड यांनी दिली.या विभागात ६० बेडचा जनरल शिशु विभाग, ३० बेडचा नवजात शिशु विभाग तर १० बेडचा लहान मुलांसाठीचा अतिदक्षता विभाग उपलब्ध आहे. त्याचबरोबर थॅलेसिमियाग्रस्त बालकांसाठी डे- केअर सुविधा सुरु करण्यात आली आहे. या ठिकाणी अत्याधुनिक व्हेंटीलेटर्स, लेव्हल 3 प्रीमॅच्युअर बेबी केअर, मेंदू , पोट, किडनी, मुलांचे हाडाचे आजार इत्यादीवर विविध शस्त्रक्रिया, एमआरआय, सिटी स्कॅन अशा सुविधा अत्यंत माफक खर्चात उपलब्ध करण्यात आल्या असल्याचे बालरोग विभागप्रमुख डॉ. निवेदिता पाटील यांनी सांगितले.
उपचारासाठी येणाऱ्या मुलांना खेळण्यासाठी या ठिकाणी दोन कक्ष उभारण्यात आले आहे. विभागातील भिंती, वातावरण बालकांच्या भाव विश्वाशी सुसंगत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. पालकांच्या समुपदेशानाची सेवाही देण्यात आली आहे. अनुभवी व तज्ञ डॉक्टर्स आणि परिचारिका व सहाय्यक सेवेसाठी येथे कार्यरत आहेत. यावेळी कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, उपअधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालाप्पा, डॉ. मोहन पाटील, डॉ. सुहास कुलकर्णी, डॉ. रमेश निगडे, डॉ. साईप्रसाद कवळेकर, डॉ. देवयानी कुलकर्णी, डॉ. प्रीती नाईक, डॉ. श्रद्धा कुलकर्णी, डॉ. अर्चना पवार, डॉ. रवींद्र पवार, डॉ. विलास जाधव, उपकुलसचिव संजय जाधव, सहाय्यक कुलसचिव अजित पाटील, तेजशील इंगळे, प्रा. सदानंद सबनीस, केतन जावडेकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
Leave a Reply