स्वामी रामदेव महाराज ८ मार्च रोजी कोल्हापूरात

 

कोल्हापूर : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आंतरराष्ट्रीय महिला दिनी शनिवार दिनांक ८ मार्च २०२५ रोजी महिला पतंजली योग समिती महाराष्ट्र यांच्या वतीने महाराष्ट्रातील माता भगिनींसाठी राज्यस्तरीय महासंमेलनाचे आयोजन गांधी मैदान येथे करण्यात आले आहे या संमेलनासाठी योगऋषी परम पूज्य श्रद्धेय रामदेव स्वामीजी महाराज तसेच मातृ शक्तीच्या प्रेरणास्थान महिला मुख्य केंद्रीय प्रभारी साध्वी देवप्रियाजी उपस्थित राहणार आहेत.अशी माहिती महाराष्ट्र राज्य महिला वरिष्ठ महिला राज्य प्रभारी सुधा अळळीमोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी भागीरथी महिला संस्था अध्यक्ष सौ.अरुंधती महाडिक , सन्मती मिरजे, पतंजली योग समिती महाराष्ट्र राज्याचे राज्य प्रभारी चंद्रशेखर खापणे कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्ष छाया पाटील,प्रमोद पाटील अध्यक्ष, हिल रायडर्स आदी उपस्थित होते.करवीर नगरीमध्ये करवीर निवासिनी अंबाबाईच्या चरणी या राज्यस्तरीय महासंमेलनाची सुरुवात कुंकूमार्चनाने सकाळी ९ वाजता होणार आहे. यानंतर गांधी मैदान येथे योगऋषी परमपूज्य श्रद्धेय स्वामीजी रामदेव महाराज मार्गदर्शन करणार आहेत..कुंकू मार्चना बरोबर सांकृतिक कार्यक्रम, महिलांच्या रणरागिणी, मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके, विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या कर्तुत्ववान महिलांचा, संस्थांचा सत्कार अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.संपूर्ण महाराष्ट्रातून दहा हजार महिला सहभागी होतील असा अंदाज आहे. सदर कार्यक्रमाच्या नियोजनासाठी महिला योग समितीच्या १०० योगशिक्षिका स्वयंसेवक म्हणून कार्यरत राहणार आहेत.सदरचा कार्यक्रम योग शिक्षका बरोबर सर्व माता भगिनींसाठी खुला असून महिलांसाठी भोजनाची ही व्यवस्था याठिकाणी करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील महिलांसह सर्वांनी या महासंमेलनात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र प्रभारी सुधा अळळीमोरे यांनी केले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन महिलांनीच मिळून केलेले आहे.हे महासंमेलन सर्वांसाठी मोफत आहे. यावेळी पत्रकार परिषदेला दीप्ती कदम, मंगल वैद्य,अनिल जोशी, अनिता जोशी, स्नेहल कुलकर्णी,अनुपमा गोरे,नीता राजपूत, कल्पना ठोकळ आदी महिला संयोजिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!