न्यू वुमन्स फार्मसीचे स्नेहसंमेलन जल्लोषात संपन्न

 

कोल्हापूर: श्री.प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित,न्यू वुमन्स कॉलेज ऑफ फार्मसीचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले.कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत,छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.यावेळी संस्थेचे अध्यक्ष .बी.जी.बोराडे,चेअरमन डॉ. के.जी.पाटील,खजानीस वाय. एस. चव्हाण, संचालक..वाय.ल.खाडे,.डी. पाटील,.पी.सी.पाटील, संचालिका सौ.सविता पाटील,विकास अधिकारी डॉ. संजय दाभोळे आदी मान्यवर उपस्थितीत होते.स्नेहसंमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध उद्योगपती,गायक पंडित.विनोद डिग्रजकर उपस्थितीत होते. विद्यार्थ्यांनी आयुष्यात एकतरी छंद,कला जोपासावी त्यामुळे का जगायचे हे कळेल व आयुष्य आनंदी बनेल असे त्यांनी प्रतिपादन केले.यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थिनींना वर्षभर यश मिळवलेल्या विविध स्पर्धेतील पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनीं म्हणून कु.सोनल वडणगेकर तर जनरल चॅम्पियनशिप द्वितीय वर्षाने पटकाविली. यावेळी कु.आरती माने हिचा विशेष सत्कार करण्यात आला.यावेळी कॉलेजचे प्राचार्य.डॉ. रवींद्र कुंभार यांनी महाविद्यालयाच्या आढाव्याचे अहवाल वाचन केले. संस्थेचे चेअरमन डॉ.के.जी.पाटील यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. संस्थेचे अध्यक्ष श्री.बी.जी.बोराडे यांनी महाविद्यालयातील वर्षभर राबविलेल्या उपक्रमांचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.निकिता शेटे व आभार पूजाश्री पाटील यांनी मांडले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!