गोकुळ मार्फत ‘उत्कृष्ट वासरू संगोपन’ स्पर्धेचे आयोजन

 

कोल्‍हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लि. कोल्हापूर (गोकुळ) संघामार्फत महत्वकांक्षी असे जातिवंत मादी वासरू संगोपन योजना मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या गोठ्यावर राबविली जात असून या योजनेत नोंद झालेल्या रेड्या/ पाड्यांचे चांगले संगोपन होऊन त्या वेळेत दुधात याव्यात यासाठी दूध उत्‍पादकांना प्रोत्‍साहन देणेसाठी आंतरराष्ट्रीय दुग्ध दिनाच्या निमित्याने रविवार दि.०१ जून. रोजी संघाच्या वासरू संगोपन योजनेअंतर्गत नोंदणी झालेल्या वासरांच्या स्पर्धा आयोजित केल्याची माहिती गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी दिली. सदरची स्पर्धा हि पहिल्या टप्प्यात संघाच्या विभागीय पशुवैद्यकीय केंद्राकडे वासरू संगोपन योजनेतील जास्त नोंदणी झालेल्या कार्यक्षेत्रातील ३५ गावात दि.०१ जून रोजी सकाळी ०९ ते ११ वाजता या वेळेत होणार असून त्यानंतर अशी स्पर्धा प्रत्येक महिन्याला कार्यक्षेत्रातील उर्वरित गावात घेण्यात येणार आहेत. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या वासरांच्या कानात योजनेचा टॅग असणे बंधनकारक आहे. तसेच हि स्पर्धा गावातील सर्व संस्थेसाठी खुली असून ती गावातील सार्वजनिक व सोयीच्या ठिकाणी घेतली जाईल. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या रेड्या / पाड्याना संघामार्फत जंतनिर्मुलनाचे औषध मोफत देण्यात येणार आहे. सदरच्या स्पर्धा या संघाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत घेण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!