आधार हाऊसिंग फायनान्‍स पीएमएवाय अंतर्गत कोल्हापूर येथील समुदायांना मालकीहक्‍काचे घर उपलब्‍ध करून देणार

 

कोल्हापूर : आधार हाऊसिंग फाय‍नान्‍स लिमिटेड या भारतातील आघाडीच्‍या अल्‍प-उत्‍पन्‍न हाऊसिंग फायनान्‍स प्रदाता कंपनीने आपल्‍या प्रधान मंत्री आवास योजना – अर्बन २.० (पीएमएवाय-यू २.०) जागरूकता शिबिराच्‍या फेज २ च्‍या लाँचची घोषणा केली आहे, जेथे महाराष्‍ट्रातील वंचित समुदायांसाठी मालकीहक्‍काचे घर उपलब्‍ध करून देण्‍यावर लक्ष केंद्रित करण्‍यात आले आहे. आपल्‍या मागील प्रयत्‍नांच्‍या यशाला अनुसरून कंपनी १२ ते १५ जून २०२५ पर्यंत पीएमएवाय उत्‍सव आणि स्‍पॉट सॅक्‍शन शिबिराचे आयोजन आधार हाउसिंग फायनान्स लि. पाच बंगला, तिसरा मजला, दुकान क्र. ३०२,३०४,३०६ वसंत प्रतिष्ठा, ई वॉर्ड, शाहूपुरी, कोल्हापूर येथे केले आहे, ज्‍यामुळे कोल्हापूर येथील पहिल्‍यांदाच घर खरेदी करणाऱ्यांसाठी पीएमएवाय प्रक्रिया सोपी, पारदर्शक आणि सहजसाध्य होईल. हे शिबिर पात्रता तपासण्‍यामध्‍ये, आवश्‍यक कागदपत्रांची, अपेक्षित फायद्यांसह जवळपास १.८० लाख रूपयांच्‍या सबसिडीजपर्यंत माहिती देण्‍यामध्‍ये आणि त्‍वरित कर्ज मंजूरी देण्‍यामध्‍ये मदत करेल, ज्‍यामुळे कुटुंबांना त्‍यांच्या स्‍वप्‍नवत घराचे मालक बनणे सोपे जाईल. तसेच, पात्र अर्जदारांना या शिबिरांमध्‍ये कागदपत्र सत्‍यापनानंतर त्‍याच ठिकाणी गृहकर्ज मंजूर पत्र मिळेल.

आधार हाऊसिंग फायनान्‍स अल्‍प-उत्‍पन्‍न पार्श्‍वभूमींमधील पहिल्‍यांदाच घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना त्‍यांचे स्‍वप्‍नवत घराचे मालक बनण्‍याचे स्‍वप्‍न पूर्ण करण्‍यास मदत करते. सामान्‍यत: १० ते १३ लाख रूपयांपर्यंतच्‍या परवडणाऱ्या कर्ज पर्यायांसह बहुतांश ग्राहक पीएमएवाय सबसिडीसाठी पात्रता निकषांची पूर्तता करतात. नुकतेच क्रेडिट लिंक्‍ड सबसिडी स्किम (सीएलएसएस)मध्‍ये करण्‍यात आलेल्‍या सुधारणेमुळे ईएमआय कमी होत गृहकर्ज अधिक परवडणारे बनले आहे. हे विशेषत: लहान नगरे व उदयोन्‍मुख शहरांमधील ग्राहकांसाठी उपयुक्‍त आहे, जेथे गृहनिर्माणाचा खर्च कमी आणि सरकारी सबसिडीज खरेदी निर्णयांमध्‍ये मोठी भूमिका बजावतात. परतफेड सोपी व जलद करत आधारचा ईडब्‍ल्‍यूएस व एलआयजी कुटुंबांसाठी मालकीहक्‍काचे घर असण्‍याचा मार्ग सोपा व सुनिश्चित करण्‍याचा मनसुबा आहे.

आधार हाऊसिंग फायनान्‍स लिमिटेडचे व्‍यवस्‍थापकीय संचालक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी रिषी आनंद म्‍हणाले, ”आधार हाऊसिंग फायनान्‍समध्‍ये आमचे भारतातील वंचित कुटुंबांसाठी मालकीहक्‍काचे घर असण्‍याचे स्‍वप्‍न वास्‍तविकतेत आणण्‍याची ध्येय आहे. सरकारने परवडणाऱ्या घरांसाठी सादर केलेल्‍या योजनांसह पीएमएवाय व्‍याज सबसिडी योजनेमध्‍ये सुधारणा करण्‍यात आल्‍या असल्‍यामुळे पहिल्‍यांदा घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना देखील आता मालकीहक्‍काचे घर असण्‍याचे स्‍वप्‍न पूर्ण करता येईल. आमच्‍या स्‍पॉट सँक्‍शन शिबिरांच्‍या माध्‍यमातून आमचा विशेषत: उदयोन्‍मुख बाजारपेठांमध्‍ये प्रक्रिया सोपी करण्‍याचा, जागरूकता वाढवण्‍याचा आणि स्‍वप्‍नवत घराचे मालक बनण्‍याच्‍या प्रवासाला गती देण्‍याचा मनसुबा आहे.”

आधार हाऊसिंग फायनान्‍स सध्‍या ५४५ जिल्‍ह्यांमधील जवळपास ३ लाख ग्राहकांना सेवा देते, तसेच २२ राज्‍ये व केंद्रशासित प्रदेशांमध्‍ये ५८० हून अधिक शाखा आहेत. जवळपास ७४ टक्‍के पोर्टफोलिओ गृहकर्जांप्रती समर्पित आणि उदयोन्‍मुख बाजारपेठांमध्‍ये प्रबळ उपस्थिती असण्‍यासह आधार आवश्‍यक असलेल्‍या ठिकाणी परवडणारे हाऊसिंग फायनान्‍स उपलब्‍ध करून देण्‍यास उत्तमरित्‍या सज्‍ज आहे. हा उपक्रम प्रत्‍यक्ष भारत सरकारच्‍या ‘सर्वांसाठी घरे’ दृष्टिकोनाला पाठिंबा देतो आणि नॅशनल हाऊसिंग बँकेच्‍या (एनएचबी) सर्वसमावेशन ध्‍येयांशी संलग्‍न आहे. आधारची पीएमएवाय अवेअरनेस कॅम्‍पेन विकसित भारताप्रती योगदान देण्‍याच्‍या कंपनीच्‍या व्‍यापक मिशनचा प्रमुख भाग आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!