” ओळख मधुमेहाची ” परिसंवादाचे आयोजन; डॉ. राजेश देशमाने यांची माहिती

 

कोल्हापूर: आरएसएसडीआय महाराष्ट्र चॅप्टरच्यावतीनं वैद्यकीय क्षेत्रातील विविध उपक्रम राबवले जातात. सध्या मधुमेहाचं प्रमाण वाढत असून, मधुमेहाची नेमकी व्याख्या काय, मधुमेहींनी आपली दिनचर्या कशी ठेवावी, आहारमध्ये कोणते पदार्थ असावेत, औषधं कोणती घ्यावीत, असे अनेक प्रश्न रुग्णांना भेडसावत असतात. या पार्श्वभूमीवर मधुमेहाशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरं तज्ञ डॉक्टरांकडून मिळावीत. या हेतूने ओळख मधुमेहाची हा मधुमेह तज्ञांसोबतचा परिसंवाद आयोजित केला आहे. उद्या शनिवार दिनांक २१ जून रोजी सायंकाळी ५ ते ७ यावेळेत देवल क्लबमधील गोविंदराव टेंबे सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती या संस्थेचे कोल्हापूरचे समन्वयक डॉ. राजेश देशमाने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आरएसएसडीआय महाराष्ट्र चॅप्टरच्यावतीनं, आयोजित केलेल्या या परिसंवादाला खासदार श्रीमंत शाहू महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून, या प्रतिसंवादात मुंबईच्या लिलावती हॉस्पिटलचे मधुमेह तज्ञ डॉ. विजय पाणीकर, मुंबईचे मधुमेह तज्ञ डॉ. विजय नेगलूर, डॉ. लोतीका पुरोहित, डॉ. संहिता वालावलकर, डॉ. राजीव कोविल, डॉ. मयूरा काळे आणि डॉ. निखिल नाशीककर हे तज्ञ डॉक्टर मधुमेहाबाबत परिपूर्ण मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती डॉ. राजेश देशमाने यांनी दिली. विशेषबाब म्हणजे या कार्यक्रमांतर्गत मधुमेह, लठ्ठपणा आणि ३० पेक्षा जास्त बीएमआय असणाऱ्या सुमारे १२० ते १५० रूग्णांसाठी बाजारात २ हजार ते ३ हजार रुपये आकारणी केली जाणारी फायब्रोस्कॅन तपासणी या ठिकाणी मोफत केली जाणार आहे. या मोफत तपासणीचा लाभ घेण्यासाठी ९६ ३७ ३० २४ २४ या क्रमांकाशी संपर्क साधण्याचे आणि शनिवारी २१ जूनला सायंकाळी ५ ते ७ या वेळेत देवल क्लबच्या गोविंदराव टेंबे सभागृहात उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. राजेश देशमाने यांनी केले. पत्रकार परिषदेला एन्डोक्रिनोलॉजिस्ट डॉ. शर्विल गाडवे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!