दहा हजार महिला लाभार्थ्यांना पिंक ई रिक्षा योजनेचा लाभ: मंत्री अदिती तटकरे यांची प्रमुख उपस्थिती

 

कोल्‍हापूर : महिलांचे सक्षमीकरण आणि शाश्वत गतीशीलतेच्‍या दिशेने पाऊल उचलत महाराष्‍ट्र सरकारने ‘पिंक ई-रिक्षा’ योजना सुरू केली आहे. महिला व बाल विकास विभागाच्‍या नेतृत्‍वांतर्गत या उपक्रमाची पुणे, नाशिक, नागपूर, अहमदनगर, सोलापूर, कोल्‍हापूर, अमरावती व छत्रपती संभाजीनगर या ८ जिल्‍ह्यांमध्‍ये १०,००० पर्यावरणपूरक कायनेटिक ग्रीन इलेक्ट्रिक तीनचाकी रिक्षा तैनात करण्‍याची योजना आहे, ज्‍यामुळे महिला सक्षमीकरण आणि हरित पर्यावरणाला चालना मिळेल.
प्रमुख अतिथी महिला व बाल विकास विभाग मंत्री श्रीमती अदिती तटकरे, तसेच कायनेटिक ग्रीनच्या संस्थापिका व मुख्‍य कार्यकारी अधिकारी सुलज्‍जा फिरोदिया मोटवानी आणि सह-संस्थापक व कार्यकारी संचालक रितेश मंत्री यांच्या हस्‍ते आज ८ ऑगस्ट रोजी कोल्हापूर येथे झालेल्या कार्यक्रमात महिला लाभार्थ्यांना पिंक ई-रिक्षाचा चौथा ताफा सुपूर्द करण्यात आला.
या योजनेअंतर्गत, महाराष्‍ट्र सरकार प्रत्येक ई-रिक्षाच्या किमतीवर २० टक्‍के अनुदान देईल, तर लाभार्थी १० टक्‍के रक्‍कम डाउन पेमेंट म्हणून देतील. उर्वरित ७० टक्‍के रक्‍कम प्रमुख वित्तीय भागीदारांनी दिलेल्या बँक कर्जाद्वारे दिली जाईल, ज्यामधून सुलभ आणि कमी व्याजदरामध्‍ये आर्थिक साह्याची खात्री मिळेल. याव्यतिरिक्‍त, महाराष्‍ट्र सरकार व कायनेटिक ग्रीन लाभार्थ्यांशी संलग्‍न होण्‍यासाठी आणि बचत गटासोबत सहयोग करण्यासाठी विविध ठिकाणी प्रत्यक्ष उपक्रम राबवतील. त्यांना अधिक पाठिंबा देण्यासाठी कायनेटिक ग्रीन मोफत ड्रायव्हिंग प्रशिक्षण देईल, ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यास मदत करेल आणि उत्तम चार्जिंग पायाभूत सुविधा उभारेल. कायनेटिक ग्रीन आठ सहभागी जिल्ह्यांमध्ये १५०० चार्जर तैनात करणार आहे, जेणेकरून योजनेच्या प्राप्‍तकर्त्यांना सर्वांगीण सुविधा उपलब्‍ध होतील. तसेच, वेईकल आणि बॅटरी दोन्ही पाच वर्षांच्या वॉरंटीसह येतील, सर्व नियतकालिक आणि प्रतिबंधात्मक देखभाल सेवांचा समावेश असलेला व्यापक वार्षिक देखभाल करार (एएमसी) असेल, ज्यामध्ये पाच वर्षांसाठी प्रत्येक तिमाहीत एक मोफत सेवा समाविष्‍ट असेल.
कायनेटिक ग्रीन महाराष्‍ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि विविध राइड-हेलिंग सेवा प्लॅटफॉर्मसोबत सक्रियपणे धोरणात्मक सहयोग करत आहे. हे सहकार्य प्रवाशांना पहिल्या आणि शेवटच्या मैलाच्या कनेक्टिव्हिटीचे महत्त्वाचे पर्याय देण्यासाठी करण्‍यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे, हा उपक्रम विश्वासार्ह आणि खात्रीशीर उत्पन्‍नाचा स्रोत निर्माण करतो, जो त्यांना सुलभ आणि पर्यावरणपूरक परिवहन उपायांद्वारे सक्षम करतो.
यावेळी  कायनेटिक ग्रीनच्‍या संस्‍थापिका व मुख्‍य कार्यकारी अधिकारी सुलज्‍जा फिरोदिया मोटवानी म्‍हणाल्‍या, ”कायनेटिक ग्रीनमध्‍ये पिंक ई-रिक्षा योजनेमधून हा महिलांच्‍या सक्षमीकरणासह पर्यावरणीय स्थिरतेला प्राधान्‍य दिले जाते. महिलांना उदरनिर्वाहाच्‍या विश्वसनीय व प्रतिष्ठित स्रोतासह सुसज्‍ज करत आम्‍ही त्‍यांच्‍या आर्थिक स्थितीमध्‍ये परिवर्तन आणि तसेच आत्‍मविश्वास व स्‍वावलंबीपणाला चालना देतो. हा उपक्रम प्रबळ समुदाय आणि शुद्ध व पर्यावरणाप्रती जागरूक भविष्‍य घडवण्‍याच्‍या दिशेने पाऊल आहे, जेथे प्रत्‍येक स्त्रीला प्रगती करण्‍याची आणि शाश्वत विश्वाप्रती योगदान देण्‍याची संधी आहे.
या उपक्रमाबाबत मत व्‍यक्‍त करत कायनेटिक ग्रीनचे मोबिलिटी अँड इंटरनॅशनल बिझनेसचे अध्‍यक्ष सुधांशू अग्रवाल यांनी पिंक ई-रिक्षाच्‍या सर्वोत्तम मानवी प्रभावावर भर दिला. ते म्‍हणाले, ”हा उपक्रम महिलांना उदरनिर्वाहाचे माध्‍यम उपलब्‍ध करून देत आहे, तसेच त्‍यांना स्‍वावलंबीपणे जीवन जगण्‍याचा व समाजाप्रती अर्थपूर्णपणे योगदान देण्‍याचा आत्‍मविश्वास देखील देत आहे. आणि प्रत्‍येक महिलेला तिचे स्‍वत:चे भविष्‍य घडवण्‍याची संधी आहे.”
ही योजना २० ते ५० वर्षे वयोगटातील महिलांसाठी आहे, ज्यामध्ये विधवा, घटस्फोटित आणि दारिद्र्यरेषेखालील महिलांना प्राधान्य दिले जाते. कायनेटिक ग्रीन पिंक ई-रिक्षा प्रति चार्ज १२० किमी रेंज देते. या वेईकलमध्‍ये उच्‍च दर्जाच्‍या आरामदायीपणासाठी ड्युअल सस्पेंशन, डिजिटल डिस्प्ले पॅनल, ड्युअल हेडलॅम्प आणि २२० मिमी उच्‍च ग्राउंड क्लीयरन्स आहे. ड्रायव्हर आणि चार प्रवाशांसाठी डिझाइन केलेली ही वेईकल मानक १६-अॅम्पियर होम सॉकेट वापरून सोयीस्करपणे चार्ज करता येऊ शकते.
कायनेटिक ग्रीन लाभार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी एजन्सी नियुक्‍त करणार आहे, ज्‍यामुळे सर्व चालक त्यांच्या ई-रिक्षा कार्यक्षमतेने चालवण्यासाठी आवश्यक कौशल्यांसह सुसज्ज असतील. महाराष्‍ट्राने लिंग समानता आणि हरित गतिशीलतेकडे धाडसी पाऊल उचलले असताना कायनेटिक ग्रीन अधिक न्याय्य आणि शाश्वत भविष्याच्‍या दिशेने मार्ग सुकर करण्‍याप्रती कटिबद्ध आहे. यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती,पालकमंत्री प्रकाश आबिटकर,वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आदिल फरास आदी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!