श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी श्रावण व्रत वैकल्याचे आयोजन: आ. राजेश क्षीरसागर यांची माहिती 

 

कोल्हापूर : कोल्हापुरातील समस्त हिंदुत्ववादी संघटना व राजेश क्षीरसागर फौंडेशनच्या वतीने हिंदू धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्यानिमित्त श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी म्हणजेच दि. ११ ऑगस्ट, २०२५ रोजी सायं.६.०० ते रात्री १०.०० या वेळेत “नष्टे लॉन, महावीर गार्डन जवळ, कोल्हापूर” येथे “श्रावण व्रत वैकल्य” या सामुदायिक उपवास सोडण्याच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे. समस्त हिंदू धर्म संघटनांच्यावतीने आयोजित केल्या जाणाऱ्या श्रावण व्रतवैकल्य कार्यक्रमाच्या नियोजनासाठी आज शिवालय शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथे हिंदु संघटनांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, हिंदू धर्मातील सणांची महती सर्वांना व्हावी, हिंदू धर्माचे जागरण व संघटन व्हावे, याकरिता सलग गेल्या १२ वर्षांपासून समस्त हिंदू धर्म संघटनाच्या वतीने श्रावण व्रत- वैकल्य या सामुदायिक उपवास सोडण्याच्या उपक्रमाची सुरवात झाली. हिंदू धर्म प्रगतीचे काम व्हावे, हिंदू संस्कृती जपण्याचे कार्य या माध्यमातून व्हावे या हेतूने या उपक्रमाची सुरवात करण्यात आली असून, या उपक्रमास शहरवासीयांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. या उपक्रमाचे अनुकरण कोल्हापूर जिल्ह्यातील इतर गावातही होत गेले आणि संपूर्ण राज्यभरातील अनेक भागात असे उपक्रम होवू लागल्याने या उपक्रमाची सुरवात कोल्हापुरातून झाली याचा आनंद होत आहे. या उपक्रमाचे स्वरूप या पेक्षाही मोठे होऊन संपूर्ण देशभरात श्रावण व्रत वैकल्य उपक्रम व्हावा, अशी इच्छा व्यक्त केली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!