त्या जागेवर मराठा स्वराज्य भवन उभे राहणार: वसंतराव मुळीक 

 

कोल्हापूर : कोल्हापुर शहर हे मराठा समाजाचा गड आहे. “मराठा भवन” हे जिल्ह्यातील मराठा समाजाचे प्रतिक ठरणार आहे. मराठा समाजाने मागणी केलेली जागा शहराच्या मध्यवर्ती आहे. या ठिकाणी होणारी नियोजित इमारत ही जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून शहरात कामानिमित्त येणाऱ्या मराठा समाज बांधवाला एक हक्काचे घर ठरणार आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी मराठा समाज गोळा करत आहे. या जागेत स्पर्धा परीक्षा, कृषी केंद्र असे विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. या जागेसाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या आधीपासूनच घेतलेल्या आहेत. पण आत्ता दुसऱ्या  संस्थेस ही जागा दिल्याचे नुकतेच आमदार अशोकराव माने यांनी स्पष्ट केले. पण ही जागा मराठा स्वराज्य भवनसाठी नियोजित असून ही जागा कदापिही दिली जाणार नाही. वेळ पडल्यास लढा उभारू असा इशारा मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.तसेच शासन स्तरावर प्रस्ताव प्रलंबित असताना अचानक ही जागा कोणत्यातरी दुसऱ्या संस्थेला देणे ही मराठा समाजाची निव्वळ फसवणूक आहे. त्यामुळे मराठा समजाच्या भावना तीव्र दुखावल्या गेल्या आहेत. त्या दुसऱ्या संस्थेस अन्य कोणत्याही ठिकाणी जागा देऊन ही जागा कोल्हापूर जिल्ह्यातील मराठा समाजाच्या प्रतिक ठरणाऱ्या “मराठा भवनास” द्यावी.मराठा समाजाच्या भवनांचा विचार करून महाराष्ट्र शासनाने ही जागा कोल्हापूर जिल्ह्यातील मराठा समाजाच्या भवनासाठी द्यावी. त्यासाठी वेळ प्रसंगी तीव्र आंदोलन करण्याची तयारी सकल मराठा समाजाने ठेवली असल्याचेही त्यांनी सांगितले. या संदर्भात २५ ऑगस्ट रोजी शाऊस स्मारक भवन येते सायंकाळी पाच वाजता मराठा समाजातील कार्यकर्ते यांची बैठक घेऊन नेमकी भूमिका काय घ्यायची याविषयी मत घेऊन पुढील दिशा ठरवण्यात येईल.पत्रकार परिषदेस शशिकांत पाटील, आर.डी.पाटील, चंद्रकांत चव्हाण, विजय काकोडकर, शंकरराव शेळके, प्रकाश पाटील, संजय उर्फ काका जाधव, प्रताप नाईक, संयोगिता देसाई, संपत्ती पाटील, अवधूत पाटील, विजय पाटील आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!