
कोल्हापूर: प्रतिमा सतेज पाटील सोशल वेलफेअर ऑर्गनायझेशन यांच्यावतीने आणि डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपच्या सहकार्याने दि.28 ते 30 एप्रिल रोजी ‘गृहिणी महोत्सव-2018’ चे आयोजन केले आहे. या निमित्ताने ज्ञान, मनोरंजन, स्पर्धा, खरेदी, रोजगार मार्गदर्शन व संधी, विविध तज्ञांचे मार्गदर्शन, मशिन एक्स्पो, स्टार्टअप बिझनेस, या सर्व गोष्टी एकाच छताखाली अनुभवायला मिळणार आहेत. या महोत्सवात युवा पिढीला करिअर मार्गदशर्नाबाबत मायक्रोसॉफ्ट, टीसीएस या नामवंत कंपन्याचे अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. तसेच स्टार्टअप यशस्वी होण्यासाठीचा मुलमंत्रही या महोत्सवात दिला जाणार आहे. शाहूपुरी जिमखाना मैदान येथे हा महोत्सव होणार आहे. या वर्षी बदललेल्या नव्या स्वरुपात ‘एम्पॉवरींग कोल्हापूर’ ही थीम घेवून या महोत्सवाच्या आयोजन केल्याची माहिती सौ. प्रतिमा सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पुढे बोलताना त्यांनी सांगीतले की, या गृहिणी महोत्सवात 150 हून अधिक स्टॉल्सचा समावेश आहे. यामध्ये होम अप्लायनसेस, गारमेंट, ज्वेलरी, हॅन्डीक्राफ्टस या सारख्या वेगवेगळ्या स्टॉल्सच्या माध्यमातून शॉपिंगची संधी मिळणार आहे. त्याचबरोबर महिलांना लघुउद्योग करण्यासाठी आवश्यक असणाया सर्व मशिन्सची माहिती उपलब्ध होण्यासाठी मशिन एक्स्पो चा सुध्दा समावेश केलेला आहे. आय.टी. आणि बी.पी.ओ. या क्षेत्रातील नामवंत कंपन्यांचे स्टॉल्स या महोत्सवात असणार आहेत. या माध्यमातून युवक युवतींना या क्षेत्रातील नवीन गोष्टींची माहिती तसेच जॉबची संधी सुध्दा उपलब्ध होणार आहे. या महोत्सवात वेगवेगळ्या बँकाचा समावेश असून त्यामाध्यमातून व्यवसायासाठी कर्जाची उपलब्धता, शैक्षणिक कर्ज योजना याची सुध्दा माहिती दिली जाणार आहे. तसेच विविध स्टार्टअप बिझनेस बद्दलची माहितीही या महोत्सवातून मिळणार आहे.
या महोत्सवाच्या माध्यमातून करिअर गायडन्सबद्दल विविध क्षेत्रातील नामवंत युवा पिढीला दि.29 व 30 एप्रिल रोजी मार्गदर्शन करणार आहे. यामध्ये प्रा. केदार टाकळकर (पुणे) हे उत्तम नोकरी व्यवसायासाठी करिअरची निवड कशी करावी, श्री. दयाळ कांगणे सरकारी व खाजगी क्षेत्रात मुलींना नोकरीच्या संधी, मायक्रोसॉफ्ट कंपनीचे दिल्ली येथील निशांत शर्मा हे सायबर हॅकिंगपासून सुरक्षितता कशी राखावी?, टीसीएस पूणे चे एन. सी. गोसावी हे सॉफ्टवेअर क्षेत्रातील नोकरीच्या संधी तसेच इनिग्मा ऑटोमेशन पुणेचे संस्थापक निखिल देशमुख हे स्टार्टअप यशस्वी होण्याचा मुलमंत्र या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
या महोत्सवात महिलांसाठी दि.29 एप्रिल रोजी रांगोळी, फ्लावर डेकोरेशन, ग्रुप डान्स, मिसेस गृहिणी तर दि.30 एप्रिल रोजी कुकींग, हेअर स्टाईल, फॅशन शो या स्पर्धांची रेलचेल असणार आहे. तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून मनोरंजनाची धमाल अनुभवायला मिळणार आहे. यामध्ये दि.29 एप्रिल रोजी सचिन पिळगांवकर व स्वप्निल जोशी यांची अदाकारी अनुभवायला मिळणार आहे. तर दि.30 एप्रिल रोजी रॉक बँड शो, डान्स, मिमीक्री आदी कार्यक्रम होणार आहेत. नामवंत सिनेअभिनेत्रीच्या हस्ते विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाया महाराष्ट्रातील 5 महिलांचा गृहिणी गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. तसेच जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित वॉक फॉर प्रोग्रेस या रॅलीमधील विजेत्यांचा सत्कारही महोत्सवात करण्यात येणार आहे.
Leave a Reply