
कोल्हापूर: कोल्हापुरातील
प्रिस्टीन वुमन्स हॉस्पिटलमध्ये नव्याने ‘अँको फर्टिलिटी’ विभागाची सुरुवात करण्यात आली आहे. आज या विभागाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अँको फर्टिलिटी म्हणजेच कॅन्सर आणि फर्टिलिटी ट्रीटमेंट यांचा संयोग आहे. याच्यामध्ये जे तरूण पुरुष किंव्हा स्त्रियांना कॅन्सरचा आजार होतो त्यांना अर्थातच केमोथेरपी किंव्हा रेडिओथेरेपी दिली जाते. याच्यानंतर या ट्रिटमेंटमध्ये त्यांचे शुक्रजंतू आणि स्त्रीबीजांचा नाश होतो आणि मग त्यांची गरोदर राहण्याची आशा मावळते. अशा कॅन्सर ग्रस्त तरुण मुलांना किंव्हा मुलींना त्यांची केमोथेरपी चालू होण्याच्या अगोदरच जर त्यांचे बीजकोष बीजांड आणि स्त्रीबीजे किंवा शुक्रजंतू लॉबोरटरीमध्ये घेऊन ठेवले आणि ते साठवून ठेवले तर आणि केमोथेरपी संपल्यानंतर त्यांना त्या बीजाचा वापर करून स्वतःच्या गुणसूत्राच्या आधारे त्यांना स्वतःचे बाळ मिळू शकते. अर्थातच हा खर्च कॅन्सरग्रस्थ कुटुंबाना सोसणे अवघड असते. त्यामुळे या पद्धतीची चॅरिटी निर्माण करण्याचे प्रयोजन प्रिस्टीन वुमेन्स हॉस्पिटलने योजिले आहे. त्याला लागणारी टेक्नॉलॉजी म्हणजेच गर्भ व स्त्रीबीज साठवण करणेसाठी लागणारे तंत्रज्ञान उत्कृष्ठ स्वरूपात प्रिस्टीन वुमेन हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे. व्हिट्रीफिकेशन म्हणजे गर्भ तयार करणे, गर्भ गोठवणे, आणि गोठवलेले गर्भ वापरून गर्भाशयातून प्रेग्नसी मिळवणे ही तर सहज प्रक्रिया आहे. गेली ६ ते ७ वर्षे कार्यरत असलेली सेवा ते देत आहेत. त्यात त्यांनी बुमरँग व्हीलॉजीकल म्हणून एक मशीन आणले आहे. त्यामुळे जे गर्भ साठवलेले असतात किंव्हा जे अंडी किंव्हा स्त्रीबीज किंव्हा शुक्तजंतू जतन केलेले असतात ते स्टोअरेज हे उत्कृष्ट पद्धतीने होत आहे ना त्यामुळे कोणतीही अडचण निर्माण होत नाही ना याची सतत कॉम्प्युटरवर खात्री केली जाते. आणि सतत लॉंग मोनिटरिंग केले जाते. याच्या करीता ऑस्ट्रेलियातील बुमरँग व्हीलॉजीकल ही सिस्टीम हॉस्पिटलमध्ये नव्याने उभारण्यात आली आहे.या तंत्रज्ञानाचा उपयोग कॅन्सर असूनही पालकत्व घेऊ इच्छिणाऱ्या जोडप्यांना नक्कीच होणार आहे.असे डॉ. सचिन कुलकर्णी यांनी सांगितले. कॅन्सरग्रस्तांसाठी मोफत उपचार पद्धतीमुळे हे लोकांसाठी वरदान ठरणार आहे असे मत डॉ. सुरज पवार यांनी व्यक्त केले.कार्यक्रमास डॉ अजित पाटील,मेडिकल असोसिएशन अध्यक्ष डॉ. अशोक जाधव यांच्यासह डॉक्टर्स,तज्ञ उपस्थित होते.
Leave a Reply