महायुतीचा कोल्हापूर महापालिका निवडणुकीतील जाहीरनामा प्रसिद्ध

 

कोल्हापूर: कोल्हापूर महान महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महायुतीने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला यामध्ये केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने अनेक सेवांचे डीजिटलायझेशन केल्यानंतर लोकांचा वेळ,त्रास मोठ्या प्रमाणात वाचतो आहे, तसेच शासकीय निधीतील गळती रोखली गेली आहे.
याच धर्तीवर महापालिकेत ऑनलाईन सुविधांचे जाळे निर्माण करण्याचा प्रयत्न असेल. नागरिकांचा जन्मापासून मृत्यूपर्यंत महापालिकेशी संबंध येतो. नागरीकांसाठीच्या सर्व सुविधा विनासायास मिळाव्यात यासाठीच्या व्यवस्था केली जाईल. जगातील सर्व स्मार्ट शहरात महापालिकांतून पुरवल्या जाणाऱ्या सेवा ऑनलाईन अॅपद्वारे दिल्या जातात. हीच कल्पना कोल्हापूर
महापालिकेतही .mykmc अॅपच्या माध्यमातून अवंलबली जाईल. सर्व नागरिकांसाठी एकाच अॅपवर जन्म – मृत्यू दाखल्यांपासून ते बांधकाम परवाना, घरफाळा, बसपास, गाळाभाडे, परवाना शुल्क आदी भरता येईल त्यासाठी महापालिकेत हेलपाटे मारावे लागणार नाहीत.महापालिका नवी इमारत
महापालिकेच्या मुख्यालयासाठी नवी इमारत उभारण्यात
येईल, त्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही.
महापालिका अर्थसंकल्पापूर्वी नागरिकांच्या सूचना मागवल्या जातील. या सूचनांचा विचार करणारा नागरीकांच्या सहभागाचा अर्थसंकल्प हे महापालिकेचे वैशिष्ट्य बनेल.
घरफाळा आकारणीसाठी प्रत्येक महापालिकेत निराळी पद्धत आहे. मुंबई वगळता राज्यभर समान पद्धतीने घरफाळा आकारणीची पद्धत लागू करण्यासाठी नागरीकांना विश्वासात घेऊन आणि
तज्ज्ञांचाही सहभाग घेऊन महापालिकेच्या मालमत्ता भाड्याने घेण्यास व्यवासायिक तयार होत नाहीत त्यात महापालिकेची प्रचलित घरफाळा आकारणी हे प्रमुख कारण आहे. व्यावसायिकांशी सल्लामसलत करुन यावर धोरणात्मक निर्णय घेतला जाईल. महापालिकेच्या सर्व आरक्षित जागा ताब्यात घेऊन त्यावर ज्या सेवांसाठी आरक्षण आहे त्या सेवा पुरवल्या जातील.
महापालिकेच्या शाळांची स्थिती सुधारण्यासाठी एक तज्ज्ञांची समिती नेमून सुचना घेतल्या जातील. जगर नगरमधील शाळेच्या धर्तीवर अन्य शाळांचे शैक्षणिक व्यवस्थापन केले जाईल. ज्या भागात शाळा पूर्णतः बंद आहेत तेथील शाळा इमारतींचा वापर नागरीकांच्या अन्य सुविधांसाठी केला जाईल.
पंचगंगेची प्रदूषण मुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्याला केंद्र व राज्य शासनाच्या अमृत योजनेची जोड देऊन त्या अंतर्गत ड्रेनेज व्यवस्था सुधारणे, मलनि:सारण प्रकल्पाची उभारणी करणे, महापालिकेच्या हद्दीतून जाणारे सर्व सांडपाणी प्रक्रीयेविना सोडले जाणार नाही याची दक्षता घेणे आणि पंचगंगा घाट सुशोभिकरण करण्यास प्राधान्याने प्रयत्न रंकाळा तलावाचे नैसर्गिक सौंदर्य न बिघडवता त्याचा विकास करण्याचे धोरण ठेवले जाईल.
रंकाळ्यात सांडपाणी जाणार नाही याची चोख व्यवस्था करण्यावर भर असेल. याचा भाग म्हणून धुण्याच्या चाव्या नियमितपणे वापरात राहतील अशी व्यवस्था केली जाईल. केशवराव भोसले नाट्यगृह
केशवराव भोसले नाट्यगृहाचे नुतनीकरण पूर्ण करण्यासोबतच कोल्हापूरात अत्याधुनिक कन्व्हेंशन सेंटरची उभारणी केली जाईल.
कोल्हापूरात पुढील पाच वर्षात किमान २०० इलेक्ट्रिक बसचा ताफा कार्यान्वित केला जाईल. यासाठी आवश्यक त्या बसेस, चार्जिंग स्टेशन याची व्यवस्था केली जाईल. या बसेससाठी तिकीट,
दिवसाचा किंवा मासिक पास ऑनलाईन दिला जाईल. तसेच शहर अंतर्गत ७० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास योजना लागू करणार. कचरा उठाव मध्ये अधिक नियमितपणा तंत्रज्ञान कुशल मनुष्यबळ आणि व्यवस्थापन यंत्रणेद्वारे, अमुलाग्र बदल. वाढती उपनगरे, अपार्टमेंट, गृह प्रकल्पासाठी तज्ञ, अनुभवी पर्यावरणवादी
यांचे मार्गदर्शन. आणि सामाजिक संस्थांचा सहभाग घेतला जाईल.
शहराच्या उपनगरात आजही जी क्रीडांगणे आहेत (शिवाजी स्टेडीयम, शाहू स्टेडीयम ) यांचे नूतनीकरण तसेच असलेल्या जलतरण तलावांचे संवर्धन व नियोजन करून खेळाडूंना योग्य सुविधा देणे…कोल्हापूर महापालिकेडून सध्या बंद पडलेल्या कोल्हापूर केसरी कुस्ती स्पर्धा पुन्हा सुरु केल्या जातील. तसेच महापालिकेचा संगीत महोत्सवही सुरु केला जाईल. उपनगरात सीसीटीव्ही चे जाळे आवश्यक. अनेक चौक, हमरस्ते, नागरी वस्ती, सार्वजनिक वास्तू
अशा ठिकाणी सीसीटीव्ही द्वारे नियंत्रण, देखरेख व सुरक्षा ज्यामुळे महिला, मुली, वृद्ध यांना शहरात सुरक्षित आणि भयमुक्त वाटेल आणि प्रामुख्याने महिलांना-मुलींना निर्भय, निकोप वातावरण देणार.अंमली पदार्थापासून युवा पिढी दूर रहावी यासाठी भरारी पथकाद्वारे लक्ष ठेऊन त्यानुसार कडक कारवाईचे धोरण अमलात आणणार. महापालिकेच्या काही आरक्षित जागांवर सशुल्क पार्किंग तळ उभारले जातील.ज्यामुळे शहरातील पार्किंगचा ताण हलका होईल.आरोग्यविषयक जागृत असणाऱ्या कोल्हापुरकरांसाठी महानगरपालिकेच्या ओपन जागेमध्ये विविध मोठी झाडे लावून, ऑक्सिजन, ताजी हवा, यासाठी प्राधान्याने प्रयत्न. नागरिकांचे आरोग्य, मैत्र आणि आनंद जपणारे.ऑक्सिजन पार्क तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारले जाईल.कोल्हापूर शहरातील सर्व प्रमुख रस्ते पुढील २५ वर्षे टिकतील असे सिमेंट कॉन्क्रिटचे करून शहरात येणाऱ्या सर्व प्रवेशमार्गाचे रुंदीकरण करून आवश्यक तेथे फ्लाय ओव्हरची उभारणी
यासाठी प्राधान्याने प्रयत्न… तसेच कोल्हापूरच्या प्रवेशद्वारांचे संस्कृतीशी सुसंगत सुशोभिकरण केले जाईल.
शहरातील प्रमुख झोपडपट्टी (विचारे माळ, राजेंद्र नगर, कनान नगर, सिद्धार्थ नगर, वारे वसाहत) या सारख्या वस्तीतील नागरिकांना झोपडपट्टीधारकांना प्रॉपर्टी कार्ड मिळवून देणार.वाय पी पोवार नगर, उद्यम नगर, पांजर पोळ येथे पायाभूत सुविधा आणि नव्या उद्योजकांना आश्वासक वातावरण तसेच कोल्हापूर आय टी हब व्हावे यासाठी सर्व इंफ्रास्ट्रक्चर उभारणार, सुविधा, परवानग्या, यासाठी शासनाकडून सर्वतोपरी पाठपुरावा व पूर्तता कोल्हापूर शहरातील सर्व मोठ्या सार्वजनिक बागांचे लोकसहभागातून व KSBP च्या धर्तीवर
कंपनी CSR फंडातून सुशोभीकरण व नूतनीकरण करण्यास प्राधान्य. शहरातील रस्त्यांवरील दिवे सौर उर्जेचे बसविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या एकत्रित योजनातून प्रयत्न तसेच फेरीवाले हे नागरी जीवनाचा भाग आहेत मात्र शहरातील रस्त्यांवरील टपऱ्यांचा विळखा सोडवला जाईल. फेरीवाल्यांची रोजीरोटी कायम ठेवताना त्याचा वाहतूकीस अडथळा होणार नाही आणि फुटपाथ व्यापले जाणार नाहीत याची दक्षता घेतली जाईल. फेरीवाल्यांसाठी त्यांच्याशी चर्चा करुन झोन ठरवले जातील तसेच शहरातील खाऊ गल्ल्यांमध्ये शिस्त आणली जाईल. प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजने अंतर्गत संपूर्ण शहरात गॅस पाइपलाइनची पुर्तत्ता करणेसाठी
प्राधान्याने प्रयत्नशील राहणार.चित्र, शिल्प, नाट्य, संगीत यामध्ये जग प्रसिद्ध असणाऱ्या कोल्हापुरातील कलाकारांसाठी
महापालिकेतर्फे कार्यशाळा, स्पर्धा, प्रदर्शने, कला पुरस्कार यासोबतच कोल्हापुरी हस्तकला,शिल्पकला यांच्या योग्य ब्रँडिंग साठी पुढाकार घेणार.कोल्हापूर शहरात बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु करून मोफत व अल्प दरात नागरिकांना उपचारांची सुविधा देणार. सोबत..सी पी आर हॉस्पिटलमध्ये अधिक सक्षमतेने,
आधुनिक उपचार देण्यासाठी सुव्यवस्था व सुशासन यावर भर दिला जाईल.संपूर्ण शहरात महिलांसाठी स्वच्छतागृहे उभारणी करणे…
यासाठी किमान 10 जागी योग्य जागा निवडून, महिला व पर्यटकांसाठी स्वच्छतागृहे उभारणे. करवीर राज्य संस्थापिका महाराणी ताराराणी यांचे हे त्रिशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी (३५० वे)जयंती वर्ष आहे. या निमित्ताने महापालिकेच्यावतीने दरवर्षी एका कर्तृत्ववान महिलेसभद्रकाली ताराराणी पुरस्काराने’ सन्मानित केले जाईल. असे या जाहीरनाम्यातील काही ठळक मुद्दे आहेत.याप्रसंगी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्यमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर,खासदार धनंजय महाडिक ,राज्य नियोजन मंडळ कार्यकारी अध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसागर,आ. जयश्रीताई जाधव,भाजप प्रदेश सचिव महेश जाधव, भाजप कोल्हापूर महानगर अध्यक्ष विजय जाधव शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय बलुगडे, कृष्णराज महाडिक, मा. नगरसेवक प्रताप शिरोडकर व महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments are closed.

error: Content is protected !!