कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस व मित्रपक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या कसबा बावडा येथे झालेल्या जाहीर सभेस मा. डॉ. संजय डी. पाटील, आमदार जयंत आसगांवकर, ऋतुराज संजय पाटील यांनी उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधला.
यावेळी शिवसेनेचे उपनेते संजय पवार, कॉ. दिलीप पवार, कॉ. उदय नारकर, कॉ. सतीशचंद्र कांबळे, कॉ. रघुनाथ कांबळे, श्रीराम सेवा सोसायटीचे सभापती, उपसभापती, सर्व आजी-माजी संचालक, काँग्रेस व शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ही सत्तेची लढाई नसून विचारांची लढाई आहे. भाजपने पोलिस, निवडणूक आयोगआणि पैसा या माध्यमातून शिव- शाहू- फुले- आंबेडकरांच्या विचारांवर बुलडोजर चालवला आहे. हा विचार वाचवण्यासाठी सर्व उमेदवारांना विजयी करून काँग्रेसला पाठबळ द्या असे आवाहन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ जी यांनी केले.
सत्तेचा मुकुट नव्हे तर माझ्यासाठी जनतेचे प्रेम महत्वाचे आहे. कोल्हापूरचा सर्वांगीण विकास करण्यासाठी, काँग्रेसचा जाहीरनामा प्रत्यक्षात आणण्यासाठी येत्या १५ जानेवारीला काँग्रेस व मित्रपक्षांच्या सर्व उमेदवारांना विजयी करा असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी मतदारांना केले.
