पणजी : पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री, मा. श्री. हरदीप सिंग पुरी यांनी आज गोवा येथे होत असलेल्या इंडिया एनर्जी वीक 2026 मध्ये जिओ-बीपी (रिलायन्स इंडस्ट्रीज आणि बीपी यांच्या संयुक्त उद्योगाचा रिलायन्स बीपी मोबिलिटी लिमिटेड (RBML) चा कार्यरत ब्रँड,) येथे क्रांतीकारी ‘ऍक्टिव्ह’ टेक्नॉलॉजीचे पेट्रोलचे अनावरण केले. जिओ-बीपी येथील ‘ऍक्टिव्ह’ टेक्नॉलॉजीचे पेट्रोल इंजिनचे महत्त्वाचे भाग स्वच्छ करण्यासाठी, प्रभावी स्वच्छता क्षमता देण्यासाठी, इंजिनची कार्यक्षमता पूर्ववत करण्यासाठी आणि त्याचे संरक्षण करण्यासाठी, तसेच नियमित पेट्रोलच्या तुलनेत वाहनचालकांना दरवर्षी 100 किमी पर्यंत जास्त अंतर पार करण्यास मदत करण्यासाठी याची निर्मीती करण्यात आली आहे. आणि विशेष म्हणजे, हे सर्व कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय उपलब्ध आहे.जिओ-बीपीचे ऍक्टिव्ह टेक्नॉलॉजी असलेले हे पेट्रोल तयार करतांना वाहनचालकांच्या दैनंदिन तसेच महत्त्वाच्या गरजा लक्षात घेता तयार करण्यात आले आहे: म्हणजेच प्रवास अधिक सुरळी व्हावा आणि प्रत्येक वेळी पेट्रोल भरल्यावर जास्त किलोमीटरची रेंज मिळावी, त्यासाठा अतिरीक्त खर्च लागू नये, तसेच इंजिनचे संरक्षण आणि स्वच्छता यांचा विचार करण्यात आला आहे. इंजिनच्या नाजूक भागांवर चिकटलेला मळ हे पेट्रोल स्वच्छ करते, ज्यामुळे इंजिनची कार्यक्षमता सुधारते आणि ते अधिक सहजतेने चालते.सामान्य भारतीय दुचाकी आणि चारचाकी वापरकर्त्यांसाठी, कोणताही अतिरिक्त खर्च न करता, दरवर्षी 100 किलोमीटरपर्यंतचा अतिरिक्त ड्रायव्हिंगचा फायदा मिळू शकतो.जिओ-बीपीने कोईम्बतूर येथील टेस्ट ट्रॅकवर 4,000 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरासाठी एका मोटरसायकलची चाचणी केली. हे प्रभावी प्रात्यक्षिक इंडिया एनर्जी वीकच्या प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आले.या क्रांतिकारी उत्पादनाबद्दल बोलताना, जिओ-बीपीचे अध्यक्ष सार्थक बेहुरिया म्हणाले: “भारतीय वाहनचालक साध्या, व्यावहारिक फायद्यांना महत्त्व देतात – जसे की, सुरळीत चालणारी इंजिने, अधिक विश्वसनीयता, कमी देखभाल खर्च आणि कमी इंधनात जास्त मायलेज. जिओ-बीपी ऍक्टिव्ह टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून, आम्ही असे पेट्रोल सादर करत आहोत जे गाडी चालवताना इंजिनला सक्रियपणे स्वच्छ करते, ज्यामुळे हानिकारक चिकट मळाचे होणारे दुष्परिणाम कमी होण्यास मदत होते.
