क्रीडाई, कोल्हापूर आयोजित गृहप्रदर्शनाचा शुभारंभ संपन्न; आजपासून प्रदर्शन सुरु 

 

कोल्हापूर: कोल्हापूरकरांच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महासैनिक दरबार लॉन्स येथे दिनांक ३० जानेवारी ते ०२ फेब्रुवारी २०२६ दरम्यान सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत खुले राहणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यांच्या निधनामुळे या प्रदर्शनाचे आज साधेपणाने उद्घाटन करण्यात आले.

आपल्या स्वप्नातील घर या प्रदर्शनामध्ये आपल्याला मिळू शकते. तसेच बांधकाम विषयक सर्व साहित्य हे एकाच छताखाली येथे उपलब्ध आहे.दालन या प्रदर्शनात कोल्हापुरातील सर्व गृहप्रकल्पांचे शंभरहून अधिक स्टॉल्स उपलब्ध आहेत. घराचे स्वप्न बाळगणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला येथे सविस्तर माहिती दिली जाते. तसेच उपलब्ध असणारे साईट्स, फ्लॅट यांची देखील व्यवस्थित माहिती पत्रकासह इथे मिळणार आहे. तरी आजच या प्रदर्शनाला अवश्य भेट द्यावी. असे आवाहन दालन प्रदर्शनाचे अध्यक्ष महेश यादव आणि क्रीडाईचे अध्यक्ष के.पी.खोत यांनी केले आहे. कार्यक्रमास उपाध्यक्ष प्रकाश देवलापूरकर, चेतन वसा, सचिव गणेश सावंत, खजिनदार अजय डोईजड, दालनचे व्हाईस चेअरमन आदित्य बेडेकर, समन्वयक निखिल शहा, सचिव संग्राम दळवी आणि खजिनदार अमोल देशपांडे, राजीव पारीख संदीप मिरजकर यांच्यासह क्रीडाईचे सर्व संचालक व सदस्य उपस्थित होते.

Comments are closed.

error: Content is protected !!