कोल्हापूर/प्रतिनिधी : क्रीडाई कोल्हापूरच्या वतीने आयोजित ‘दालन २०२६’ हे प्रदर्शन पाहण्यासाठी आज शनिवारी बांधकाम व्यावसायिकांसह विद्यार्थीनी केली होती गर्दी.
बांधकाम व्यावसायिकांसाठी आयोजित दालन प्रदर्शन बांधकाम व्यावसायिकांसाठी वेगवेगळी माहिती घेऊन आले आहे.या प्रदर्शनाच्या माध्यमातून बांधकाम व्यावसायिकांना नवनवीन योजनांची माहिती मिळत आहे.नवीन प्रकल्प,अत्याधुनिक तंत्रज्ञान, बांधकाम साहित्य आणि गृहकर्ज देणाऱ्या बँका यांची माहिती एकाच छताखाली या प्रदर्शनात मिळत आहे.
या प्रदर्शनात, एकाच छताखाली शेकडो रेसिडेन्शिअल आणि कमर्शियल प्रोजेक्ट्स पाहण्याची संधी कोल्हापूरकरांना मिळत आहे. तुमच्या स्वप्नातील घर आणि भविष्यातील गुंतवणूक यांचा अचूक संगम म्हणजे क्रीडाई कोल्हापूरचे ‘दालन २०२६’ ही प्रदर्शन आहे.अजून दोन दिवस महासैनिक दरबार येथे हे प्रदर्शन सुरू राहणार आहे.
क्रीडाई कोल्हापूरतर्फे आयोजित ‘दालन २०२६’ हे भव्य बांधकाम व वास्तू विषयक प्रदर्शन आहे.याठिकाणी विविध ठिकाणचे बांधकाम व्यावसायिक भेट देत आहेत.
आज प्रा. एम. जी. गाडगीळ यांनी आधुनिक स्थापत्यामधील नावीन्यपूर्ण सोल्युशन्स या विषयावर बांधकाम व्यावसायिकांना मार्गदर्शन केले. प्रख्यात लेखक अच्युत गोडबोले ‘एआय आणि बदलणारे जग’ या विषयावर संवाद साधला.
क्रीडाई कोल्हापूरचे अध्यक्ष के. पी. खोत, दालन प्रदर्शनाचे अध्यक्ष महेश यादव,उपाध्यक्ष प्रकाश देवलापूरकर, चेतन वसा, सचिव गणेश सावंत, खजिनदार अजय डोईजड, दालनचे व्हाईस चेअरमन आदित्य बेडेकर, समन्वयक निखिल शहा, सचिव संग्राम दळवी आणि खजिनदार अमोल देशपांडे, राजीव पारीख, संदीप मिरजकर, यांच्यासह क्रीडाईचे सर्व संचालक व सदस्य यांनी अथक परिश्रम केले आहे.
