कोल्हापूरमध्ये ‘महाराष्ट्र फुटबॉल लीग’ होणार : मालोजीराजे छत्रपती

 

कोल्हापूर:महाराष्ट्रात फुटबॉलला व्यावसायिक पातळीवर नवी दिशा देण्याच्या उद्देशाने ‘महाराष्ट्र फुटबॉल लीग’ची सुरुवात करण्यात येत आहे. ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन (AIFF), वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (WIFA) आणि कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन (KSA) यांच्या मान्यतेने , Prosportz या संस्थेच्या नियोजनाखाली ही लीग होणार आहें. इंडियन प्रीमियर लीग ही स्पर्धा. (IPL) आणि इंडियन सुपर लीग (ISL) यांच्या धर्तीवर फ्रँचायझी पद्धतीने पार पडेल. पहिल्या हंगामात महाराष्ट्रातील विविध शहरांचे प्रतिनिधित्व करणारे १० वरिष्ठ पुरुष संघ सहभागी होणार आहेत.महाराष्ट्र मध्ये फुटबॉल हा खेळ वाढावा त्याला व्यवसायिक स्वरूप यावे म्हणून केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांचे या महाराष्ट्र फुटबॉल लीगला विशेष सहकार्य लाभले आहे.ही स्पर्धा मे २०२६ मध्ये कोल्हापूर येथे आयोजित केली जाईल.यावेळी Prosportz संस्थेचे संचालक अनिरुद्ध पोले आणि कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

 

Comments are closed.

error: Content is protected !!