Lकोल्हापूर/प्रतिनिधी : कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनानवनवीन तंत्रज्ञान ऑरगॅनिक शेतीवर भर कसा द्यावा यावर वेगवेगळ्या पद्धतीचे मार्गदर्शन नेहमीच भीमा कृषी प्रदर्शनात मिळते शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करण्यासाठी केंद्र सरकारच्या योजनांचा अभ्यास करून शेतकऱ्यांनी शेतीवर अधिक भर द्यावा असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी भीमा कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिलेटची संकल्पना आणली आहारामध्ये मिलेटचा वापर होणे गरजेचे असल्याचे मतही खासदार धनंजय महाडिक यांनी यावेळी व्यक्त केले.
याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाचा ड्रोन टेक्नॉलॉजीचा वापर शेतकऱ्यांनी शेतीमध्ये करावा खासदार धनंजय महाडिक यांनी आवाहन केले.
खासदार धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून सुरू झालेले पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य अशा भिमा कृषी व पशु प्रदर्शनाचे आज फीत कापून थाटात उद्घाटन संपन्न झाले.यावेळी अध्यक्षस्थानी माजी आमदार महादेवराव महाडिक यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांचा अभ्यास करून शेतकऱ्यांनी कमी खर्चात जास्त उत्पादनावर द्यावा असे सांगितले. खासदार धनंजय महाडिक यांनी यावेळी शेतीमध्ये नवे प्रयोग, बदल स्वीकारण्यासाठी आवश्यक माहितीपूर्ण असणाऱ्या भीमा कृषी प्रदर्शनास शेतकऱ्यांनी आवर्जून भेट द्यावी असे आवाहन भीमा कृषी प्रदर्शनात उद्घाटनप्रसंगी केले. शेतकरी म्हटले की नुकसान आणि कृषी क्षेत्र म्हटले की तोटा हे नेहमी ऐकत आलो आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या बघत आलो आहे. यामुळेच गेल्या अठरा वर्षांपूर्वी भीमा कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी सुरू केले. आज या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवनवीन माहिती तंत्रज्ञान याची माहिती मिळते. कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून नवनवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न दरवर्षी असतो. नवनवीन बी बियाणे, ड्रोन टेक्नॉलॉजी, एआय चा वापर करून सेंद्रिय शेती कशी करावी,यावर भर दिला जातो. असे परिपूर्ण प्रदर्शन गेले अठरा वर्षे सातत्याने भरवले जात आहे असे सांगितले.राज्यात केंद्रात महायुतीची सत्ता आली तसेच आता कोल्हापूर जिल्ह्यात देखील महायुतीने चांगली कामगिरी केलेली आहे.महायुतीच्या माध्यमातून भरपूर प्रकल्प कोल्हापूरला मिळणार आहेत तसेच कोल्हापूर मुंबई विमानसेवा दोन वेळा सुरुवात झाली असून कोल्हापूर मिरज दुहेरी मार्गासाठी ९८४ कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. तसेच आमदार अमल महाडिक यांच्या प्रयत्नातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम कोल्हापुरात होणार आहे तसेच सर्किट बेंचचा पाठपुरावा केल्याने आज कोल्हापूरला सर्किट बेंच मिळाले आहे अजून नवनवीन अशी १५ कार्यालय कोल्हापुरात येणार असून रोजगाराच्या प्रचंड संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे कोल्हापूरचा चेहरा मोहरा महायुतीच्या काळात बदलला जाणार आहे अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.
तर महायुतीचा महापौर म्हणून आपण जबाबदारी स्वीकारली असून, कोल्हापूरच्या प्रलंबित प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे. केंद्रातील आणि राज्यातील नेत्यांचं मार्गदर्शन आणि खासदार धनंजय महाडिक, नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या सहकार्यातून विविध प्रकल्प राबवून येत्या दोन वर्षात शहराचा कायापालट करू, अशी ग्वाही महापौर रूपाराणी निकम यांनी दिली.
उद्घाटनप्रसंगी माजी आमदार महादेवरावजी महाडिक, उद्घाटनप्रसंगी विशेष अतिथी म्हणून महापौर सौ. रूपाराणी निकम,उपमहापौर श्री अक्षय जरग यांची उपस्थिती उपस्थिती होती.भाजपा प्रदेश सचिव श्री.महेश जाधव, भाजपा जिल्हाध्यक्ष मा. श्री. नाथाजी पाटील, गोकुळ संचालक अमरीश घाडगे, भागीरथी महिला संस्था अध्यक्षा मा. सौ. अरुंधती महाडिक,नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य,महापालिका नगरसेवक आदींची उपस्थिती होती.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध पुरस्कार देण्यात आले.भीमा कृषी महिलांसाठी जिजामाता पुरस्कार देण्यात आले. यामध्ये मुक्काम पोस्ट नांदोली येथील सौ विद्या बळीराम पाटील, कागल येथील सौ वंदना दिनेश मुसळे, जळगाव येथील सौ.उषा विठ्ठल पाटील, मळगे खुर्द येथील सौ प्रज्वला पांडुरंग आडमूळ, मौजे सांगाव येथील सौ जयश्री आप्पासाहेब पाटील यांचा समावेश आहे.तर भीमा कृषी शेतीभूषण पुरस्कार मध्ये महाळुंगे येथील संभाजी शिवाजी चौगुले, काळजवडे येथील श्री रामचंद्र धोंडीराम पाटील, पोरले येथील मी बाजीराव दगडू साळुंखे, नुल येथील श्री प्रकाश बाबुराव सावंत आदिना पुरस्कार देण्यात आले. आदर्श शेतकरी पुरस्कार चौडाळ येथील श्री युवराज विष्णू पाटील, अकलूर येथील श्री अनिकेत साताप्पा माने, स्वानापुर अमोल आनंदराव पाटील, सरवडे येथील श्री जयसिंग अनंत पाटील, इंजोळे येथील मानसिंग राजाराम पाटील, जाधववाडी येथील रघुनाथ पांडुरंग जाधव आदींना पुरस्कार देण्यात आले.तर युवा शेतकरी पुरस्कार सुळकुड येथील प्रदीप यलगोंडा खोत, वाळकेवाडी येथील किशोर संभाजी कुंभार, तिरपन येथील श्री शरद बाजीराव पाटील यांना पुरस्कार देण्यात आले.भारतातील सर्वात मोठा अमेरिकन आठ वर्षाचा साडेपाच फुटाचा इग्वाना (सरडा,चार वर्षाचा आणि पाच महिन्याचा सरडा आकर्षण आहे. हे तीन सरडे प्रदर्शनात आणण्यात आला असून हे तीन सरडे प्रदर्शनाचे खास आकर्षण आहेत. पहिल्याच दिवशी सरडा पाहण्यासाठी लोकांनी, शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. प्रदर्शनात आलेला हिरवा सरडा चार महिन्याचा असून त्याची लांबी दोन फूट आहे चार वर्षानंतर तो चार फुटाचा आणि आठ वर्षानंतर तो सहा फुटाचा होतो. यात पाच महिन्याचा सरडा पाव किलो वजनाचा आहे.चार वर्षाचा सरडा चार फुटाचा ९ किलो वजनाचा आहे. तर आठ वर्षाचा सरडा पाच फुटाचा असून त्याचे वजन २२ किलो आहे. हे पूर्ण शाकाहारी असून भोपळा, कोथिंबीर, मेथीची भाजी, आणि अन्य भाजीपाला खातात. दिवसातून दोन वेळा सकाळी दहा वाजता आणि रात्री आठ वाजता त्यांना खाद्य पदार्थ द्यावे कोल्हापूर मधील किशोर वसंत चव्हाण सध्या मुंबईत राहत असून त्यांनी मुंबई येथे हे सरडे लहानपणापासून पाळले आहेत. या सरड्यांना मालकाची बोलीभाषा समजते हे सरडे विषारी नसून ते वर्षातून दोन वेळा ३५ अंडी घालतात. यांचे रक्त थंड असल्याने त्यांना उष्णतेची गरज असते.
शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त असलेली माहिती मिळणारे व शेतीसाठी आवश्यक असणारे साहित्य एकाच छताखाली खरेदी करता याव्यात यासाठी १८ वे भव्य कृषी व पशूप्रदर्शन मेरी वेदर मैदानावर १३ ते १६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत भरविण्यात आले आहे. प्रदर्शनामध्ये अमेरिकन शेळ्या, बोकड, असे खास आकर्षण आहेत तर खास सांगोला, दहिवडीवरुन जातिवंत खिल्लार खोंड व खिल्लार गायी सहभागी झाल्या आहेत. परभणी, नांदेड, लातूर येथून लालकंधारी व देवणी, एच एफ जर्शी, साहिवाल, गिर इत्यादी जातीची खोंड, गाई आल्या आहेत, तसेच पंढरपुरी मुह्रा, मेहसाना, जाफराबादी म्हैस, रेडे सहभागी आहेत. तर जातिवंत घोडे, शेळ्या, मेंढ्या, वराह, विविध जातीच्या कोंबड्या तसेच विविध जातीचे पक्षी आले आहेत.
