गोकुळ मार्फत मान्यवरांचा सत्कार

 

कोल्‍हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) च्यावतीने कोल्हापूर जिल्हा परिषद सदस्य पदी निवड झाल्याबदल संघाचे संचालक अमरसिंह पाटील, अभिजित तायशेटे तसेच सौ.सुयशा अंबरिषसिंह घाटगे (व्हनाळी), कु.अमृता अरुण डोंगळे (घोटवडे), श्री.शिवाजी मुरलीधर जाधव (हुपरी) अनिरुद्ध केदारी रेडेकर (पेद्रेवाडी) यांचा गोकुळच्या वतीने संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार गोकुळ प्रकल्प, गोकुळ शिरगाव येथे करण्‍यात आला. यावेळी संघाचे संचालक व अधिकारी उपस्थित होते.यावेळी बोलताना संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ म्‍हणाले, गोकुळ ही संस्था नसून एक सशक्त कुटुंब आहे. आपल्या परिवारातील सदस्य विविध क्षेत्रांत यश संपादन करत आहेत, ही सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. हे यश केवळ व्यक्तीचे नसून संपूर्ण गोकुळ परिवाराच्या संस्कारांचे आणि सहकार्याचे फलित आहे. ते पुढे म्हणाले, जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करताना ग्रामीण भागातील विकास, शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांकडे विशेष लक्ष द्यावे. सहकारातून मिळालेली पारदर्शकता, जबाबदारी आणि जनसामान्यांप्रती संवेदनशीलता हीच मूल्ये सार्वजनिक कार्यातही जपली गेली पाहिजेत.यावेळी सत्कारास उत्तर देताना अमृता डोंगळे यांनी मनोगत व्यक्त करत सांगितले, “गोकुळ परिवाराने दिलेला सन्मान आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. संघाने जपलेली सहकाराची परंपरा आणि समाजाशी असलेली नाळ आम्हाला पुढील कार्यकाळात मार्गदर्शक ठरेल. सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे व जबाबदारीने काम करू.” माजी चेअरमन व ज्येष्‍ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, अंबरिषसिंह घाटगे, बाळासो खाडे, चेतन नरके, युवराज पाटील, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, सौ. शौमिका महाडिक, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

Comments are closed.

error: Content is protected !!