कार्यकर्त्यांच्या जोरावर काँग्रेसला नवे बळ, जिल्ह्यात ‘संघटन सृजन अभियानाला सुरवात

 

कोल्हापूर: काँग्रेस पक्षाकडून १३ ते १८ एप्रिल या कालावधीमध्ये ‘संघटन सृजन अभियान’ जिल्ह्याभरात राबवला जात आहे. आजच्या पहिल्या दिवशी खासदार शाहू छत्रपती महाराज, खासदार प्रतिभाताई धानोरकर, केंद्रीय निरीक्षक जयशंकर पाठक, राष्ट्रीय सचिव सचिन सावंत, ऋतुराज संजय पाटील यांच्यासह आमदार सतेज पाटील कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये उपस्थित होते.कार्यक्रमादरम्यान संवाद सत्र आणि आढावा बैठक पार पडली. येत्या काळातील संघटनात्मक ध्येयधोरणे, आव्हाने आणि त्यावरील उपाययोजनांवर चर्चा यावेळी झाली. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा उत्स्फूर्त सहभाग घेतला.

यावळे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, विरोधी पक्षनेता राजेश लाटकर, गटनेता इंद्रजीत बोंद्रे, निरिक्षक सुनील मालके, राहुल गायकवाड, राहुल वर्धा, नंदकुमार कुंभार, नगरसेवक नगरसेवक राहुल माने, प्रवीण केसरकर, संजय मोहीते, सुभाष बुचडे, सचिन शेंडे, प्रदेश सरचिटणीस सुर्यकांत पाटील- बुद्धीहाळकर, शशांक बावचकर, अॅड. तौफिक मुल्लाणी, इचलकरंजी शहराध्यक्ष संजय कांबळे, भारती पवार, वेदवती मोहीते, विनायक घोरपडे, बाळासाहेब सरनाईक, एनएसयुआयचे अक्षय शेळके, उदय पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments are closed.

error: Content is protected !!