आमदार सतेज पाटील स्वतः एसआयआर मोहिमेसाठी घरोघरी

 

कोल्हापूर:निवडणूक आयोगाच्या विशेष पुनर्रिक्षण (SIR) मोहिमेच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी जनतेसह पक्षाच्या कार्यकर्त्यांना सक्रीय सहभागाचे प्रतिपादन केले आहे. मतदार यादी अचूक राहण्यासाठी कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले आहे.कसबा बावडा परिसरातील यशवंत कॉलनी, अजिंक्यतारा कॉलनी, मातंग वसाहत व पंचरत्न कॉलनी येथे त्यांनी बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) सोबत घरोघरी भेटी देत प्रत्यक्ष पाहणी केली. ज्या मतदारांचे मॅपिंग झालेले नाही, अशा मतदारांशी संवाद साधत माहिती पडताळणी केली.SIR मोहिमेत मतदार यादीतील त्रुटी दूर करणे, डुप्लिकेट नावे वगळणे आणि नव्या मतदारांची नोंद करणे यावर भर दिला जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यात एकूण ३३,६७,६५९ मतदारांपैकी सुमारे २४,५२,४१७ मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले असून उर्वरित सुमारे २७ टक्के मतदारांचे मॅपिंग बाकी आहे.या पार्श्वभूमीवर काँग्रेसतर्फे जनजागृतीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत असून QR कोड व मिस्ड कॉल सुविधेद्वारे माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आमदार सतेज पाटील हे स्वतः घरोघरी जाऊन मॅपिंग नसलेल्या मतदारांची पडताळणी करत आहेत.

 

 

Comments are closed.

error: Content is protected !!