कामगार दिनानिमित्ताने गौतम अदाणी यांचा कामगारांच्या सन्मानावर भर ; पन्नास हजार कामगारांसाठी वातानुकूलित निवासस्थान

 

अहमदाबाद : अदाणी ग्रुपचे चेअरमन गौतम अदाणी यांनी आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या निमित्ताने ग्रुपच्या भविष्यातील धोरणाबद्दल माहिती दिली. त्यांनी सांगितले की आता कंपनी आपली प्रगती फक्त प्रोजेक्ट्स किंवा मालमत्तेवर मोजणार नाही, तर लोकांच्या जीवनावर होणाऱ्या परिणामावरही मोजणार आहे. या निमित्ताने कर्मचारी आणि भागीदारांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की अदाणी ग्रुप देशभरातील 24 राज्यांमध्ये 700 पेक्षा जास्त ठिकाणी काम करतो आणि सुमारे 4 लाख कर्मचारी, भागीदार आणि कंत्राटदारांसोबत कार्यरत आहे. आता अदाणी ग्रुप आपली प्रगती फक्त उभारलेल्या प्रकल्पांवर नाही, तर निर्माण झालेल्या रोजगारावर आणि सशक्त झालेल्या समाजावरही मोजणार आहे. त्यांनी असेही सांगितले की या विचारधारेत कामगारांना देशाच्या विकासाच्या केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे.

गौतम अदाणी म्हणाले अदाणी ग्रुपचे उद्दिष्ट फक्त प्रोजेक्ट पूर्ण करणे नाही, तर रोजगाराच्या संधी वाढवणे आणि समाजाला सशक्त करणे हे देखील आहे. कंपनीच्या मते, कर्मचारी, कंत्राटदार आणि भागीदार हे सर्व मिळून देशाच्या विकासात योगदान देतात. जेव्हा एखादा प्रोजेक्ट पूर्ण करतो, तेव्हा आपण फक्त काम करत नाही, तर देशाचे भविष्य घडवत असतो. त्यांनी हेही स्पष्ट केले की आता सर्व प्रोजेक्ट साइट्सवर स्थानिक लोकांना प्राधान्य दिले जाईल. आधी आसपासच्या भागातील लोकांना संधी दिली जाईल, त्यानंतर राज्यातील इतर भागांतील लोकांना आणि गरज पडल्यास इतर ठिकाणांहूनआलेल्या लोकांना कामासाठी जोडले जाईल. कामगारांचे जीवनमान सुधारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपाययोजना केल्या जात आहेत. मुंद्रा आणि खावडा येथे सुमारे 50,000 कामगारांसाठी वातानुकूलित निवासस्थान सुविधेसह राहण्याची व्यवस्था केली जात आहे. याशिवाय मुंद्रा येथे एक क्लाउड किचन तयार केले जात आहे, जिथे दररोज जवळपास 1 लाख लोकांसाठी पौष्टिक अन्नउपलब्ध करून दिले जाईल. गौतम अदाणी म्हणाले, “ही कोणती विशेष सुविधा नाही, तर एक गरज आहे. प्रत्येक कामगाराला सन्मानाने जगण्याचा आणि काम करण्याचा अधिकार आहे.

Comments are closed.

error: Content is protected !!