आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ’चा ‘बीएसई एन्हान्स्ड व्हॅल्यू ३० इंडेक्स फंड’ सादर

 

मुंबई : ‘आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स’ने आपल्या युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन्स (युलिप्स) अंतर्गत ‘आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ बीएसई एन्हान्स्ड व्हॅल्यू ३० इंडेक्स फंड’ सादर केला आहे. मोठ्या आणि मध्यम आकाराच्या व आकर्षक मूल्यांकन असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणुकीची संधी देत, दीर्घकालीन संपत्तीनिर्मिती करण्याच्या उद्देशाने हा फंड तयार करण्यात आला आहे.यावेळी ‘आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड’चे मुख्य गुंतवणूक अधिकारी मनीष कुमार म्हणाले, “आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ बीएसई एन्हान्स्ड व्हॅल्यू ३० इंडेक्स फंडा’मुळे ग्राहकांना इक्विटी बाजारात गुंतवणूक करण्यासाठी एक संरचित आणि पारदर्शक पर्याय मिळतो. मूलभूतपणे चांगली आर्थिक स्थिती असलेल्या आणि आकर्षक मूल्यांकन असलेल्या कंपन्यांवर या फंडाचा भर आहे. या फंडाची गुंतवणूक धोरणे काही महत्त्वाच्या आधारस्तंभांवर आधारित आहेत. विविध आर्थिक निकषांच्या आधारे मूल्याधारित शेअर्सची निवड, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आणि बाजार भांडवलाच्या विविध गटांमध्ये गुंतवणूक करून त्यामध्ये विविधीकरण, तसेच ठराविक नियमांवर आधारित शिस्तबद्ध गुंतवणूक प्रक्रिया असे हे आधारस्तंभ आहेत.  पद्धतीमुळे बाजारातील चढ-उतारांच्या काळातही ग्राहक दीर्घकालीन धोरण बाळगून आत्मविश्वासाने ही गुंतवणूक कायम ठेवू शकतात. तुलनेने कमी लक्ष वेधून घेणाऱ्या गुंतवणुकीच्या संधींचाही फायदा त्यांना मिळू शकतो.‘आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ बीएसई एन्हान्स्ड व्हॅल्यू ३० इंडेक्स फंड’ या फंडाची रचना ‘आयसीआयसीआय प्रु बीएसई एन्हान्स्ड व्हॅल्यू इंडेक्स’नुसार करण्यात आली आहे.दर सहा महिन्यांनी या निर्देशांकाचा आढावा घेऊन त्यात आवश्यक ते बदल आणि संतुलन केले जाते. त्यामुळे विविध क्षेत्रांमधील बदलत्या गुंतवणूक संधींनुसार फंडाचा पोर्टफोलिओ अद्ययावत राहतो. तसेच विविधीकरण आणि पोर्टफोलिओचे संतुलन राखण्यासाठी शेअर्स आणि क्षेत्रांवरील गुंतवणुकीच्या मर्यादांचाही यात समावेश करण्यात आला आहे.‘आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ बीएसई एन्हान्स्ड व्हॅल्यू ३० इंडेक्स फंड’ हा ‘आयसीआयसीआय प्रु सिग्नेचर अश्युअर’, ‘स्मार्टकिड अश्युअर विथ आयसीआयसीआय प्रु सिग्नेचर अश्युअर’, ‘आयसीआयसीआय प्रु स्मार्ट इन्शुरन्स प्लॅन अशा इतर युलिप योजनांद्वारे उपलब्ध होणार आहे. या योजनांमध्ये आयुर्विम्याची सुविधाही असेल. अधिक माहिती www.iciciprulife.com येथे उपलब्ध आहे.

Comments are closed.

error: Content is protected !!