कोल्हापूर : ॲक्शनचा भरणा असलेल्या आणि आरडीएक्सचा शोध घेणाऱ्या ‘मिशन’ या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. अखेर आता चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित व्हायला सज्ज झाला आहे. उत्तम ॲक्शन सीन्स, कलाकारांचा वाखाणण्याजोगा अभिनय, संवाद आणि गाणी या सगळ्यांचाच मेळ या चित्रपटामध्ये साधून आला आहे. हा थरारक आणि थक्क करणारा चित्रपट येत्या १५ मे २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. ॲक्शन चित्रपटांची उत्सुकता प्रेक्षक वर्गात लागली आहे. मराठीतही ॲक्शन चित्रपट येऊ शकतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘मिशन’ हा सिनेमा आहे. येत्या १५ मे २०२६ ला हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होईल. साखळी बॉम्बस्फोटाच्या वेळी ३०० किलो आरडीएक्स पैकी १०० किलो आरडीएक्स वापरलं गेलं, तर २०० किलो आरडीएक्स गेलं कुठे? याचा शोध ‘मिशन’मधून उलगडणार आहे. साखळी बॉम्बस्फोटावर आधारित हा काल्पनिक सिनेमा बनविण्यात आला आहे.’रेविकांता फिल्म्स निर्मित’ आणि ‘आकात डिस्ट्रिब्युशन’ प्रस्तुत, बहुप्रतिक्षित ‘मिशन’ हा मराठी चित्रपट आहे. मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर आणि त्यावेळच्या भीषण आरडीएक्स (RDX) शोध मोहिमेवर प्रेरित असलेलं हे थरारनाट्य येत्या १५ मे २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात अभिनेते अजॉय शर्मा महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. पोलिस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत त्यांना मोठ्या पडद्यावर पाहणे रंजक ठरणार आहे. चित्रपटात अनंत जोग, विजय पाटकर, शांती बावकर, सुरेखा कुडची, सिद्धेश आचरेकर, संकेत मोरे, ओम राणे, प्रशांत, किरण, विपुल भोईर, नंदकुमार गोरुले ही कलाकार मंडळी महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. ‘मिशन’ या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा निर्माती सौ. कांता शर्मा यांनी सांभाळली आहे. चंद्रकांत विसपुते आणि कैलाश पवार यांनी दिग्दर्शनाची धुरा पेलवली आहे. ‘आकात डिस्ट्रिब्युशन’ प्रस्तुत हा चित्रपट आहे. चित्रपटाच्या लेखनाची जबाबदारी लेखक चंद्रकांत विसपुते यांनी सांभाळली आहे. तसेच संगीत समीर खोले, मंदार कीर, रवींद्र खरात, विकी वाघ यांचे आहे. चित्रपटातील गाण्यांना गायक सुदेश भोसले, हर्षवर्धन वावरे, कस्तुरी साईराम, विकी वाघ, दिशा सुतार यांनी त्यांच्या सुमधुर स्वरात स्वरबद्ध केलं आहे. गीतकार म्हणून कृपेश, विकी, राजीव, बिपीन यांनी बाजू हाताळली. तसेच कार्यकारी निर्माता म्हणून बाबासाहेब पाटील यांनी बाजू पाहिली आहे. येत्या १५ मे रोजी हा साखळी बॉम्बस्फोटवर बनवलेला काल्पनिक सिनेमा मोठ्या पडद्यावर पाहणं रंजक ठरणार आहे. असा विश्वास चित्रपटाच्या संपूर्ण टीमने कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
