आयपीएल टी 20 स्पर्धेचे विनामुल्य सादरीकरण ‘फॅन पार्क’ चे कोल्हापूरात आयोजन

 

कोल्हापूर: देशभर प्रसिध्द असलेली क्रिकेटची लोकप्रिय व वीसीसीआय मान्यता प्राप्त टाटा आयपीएल क्रिकेट स्पर्धेचे विकमी १९ वे वर्षे आहे यावर्षी दि २८ मार्च ते ३१ मे २०२६ या कालावधीत भारतात वेगवेगळ्या राज्यातील शहरांमध्ये घेतली जात आहे या स्पर्धेच्या सादरीकरणासाठी व त्यांचा प्रचार व प्रसार करणेसाठी वीसीसीआयने भारतात ५० शहरांची व महाराष्ट्रातील नागपुर सोलापूर कोल्हापूर व रत्लागीरी या चार शहरांची निवड केली आहे त्यापैकी आपल्या कोल्हापुर शहरांचा मागील आठ वर्षीच्या प्रेक्षकांच्या अभुतपुर्व प्रतिसादा मुळे यावर्षी कोल्हापूरचा समावेश केला आहे आत्तापर्यंत आयपीएलच्या फॅन पार्कचा भारतातील वेगवेगळ्या ३५ शहरातील चार लाख किडा रसिकांनी सामन्याचा आनंद लुटला आहे दि २३ व २४ मे रोजी महाराष्ट्रातील कोल्हापूर वरोवरच तेलगंणा व आसाम या राज्यातील वेगवेगळ्या शहरात टाटा आयपीएलच्या फॅन पार्कचे एकाच वेळी थेट प्रेक्षेपण केले जाणार आहेया अनुषगांने दि २३ व २४ मे रोजी सायंकाळी ३ ते रात्री १० वाजेपर्यत आयपीएल मधील सामन्याचे दि २३ मे रोजी सायकांळी ७.३० वाजल्या पासुन व दि. २४ मे रोजी दुपारी ३ वाजल्या पासुन कोल्हापुरातील मेरी वेदर मैदानावर सादरणीकरण केले जाईल दि २३ मे रोजी सायकांळी ७.३० वाजता लखनौ सुपर जांईटस् विरूध्द पंजाब किंग्ज, दि.२४ मे २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजता मुंबई इंडियन्स विरूध्द राजस्थान रॉयल्स व सायंकाळी ७.३० वाजता दिल्ली कॅपिटल्स विरूध्द कोलकत्ता नाईट रायडर्स या तीन सामन्याचे मोठ्या पडद्यावर ३२०१८ इंच (LED SCREEN) थेट प्रेक्षपण केले जाणार आहे यासाठी पहिल्या दिवशी सायकांळी ५.०० वाजले पासुन व दुस-या दिवशी दुपारी १.०० वाजले पासुन सर्वाना सामने पाहणेसाठी प्रवेश दिला जाईल कोल्हापुरच्या क्रिडा रसिकांना अगदी स्टेडियमसारखा थरार अनुभवता येईल. या फॅन पार्कमध्ये प्रवेश सर्वाच्यासाठी विनामुल्य असणार आहे. या थेट प्रेक्षपणा बरोवरच फॅन पार्कमध्ये संगीत तसेच विविध स्टॉल्स मधुन खाण्यापिण्याचे पदार्थ आणि इतर वस्तु तसेच आपीएल च्या प्रायोजकांकडुन इतर अनेक गोष्टी उपलव्ध करून देण्यात येणार असल्यामुळे आतल्या वातावरणात आणखीनच रंगत येईल व थरारात भर पडेल. या दरम्यान मोठ्या संखेने कोल्हापुरातील अबाल वृध्द व महिला प्रेक्षकांना या सामन्याचा प्रत्यक्ष स्टेडियमसारखा अनुभव घेता येईल. जेष्ठ नागरीकांच्यासाठी स्वतत्र वैठक सुविधा असेल. अशी माहिती बीसीसीआयचे प्रतिनिधी अल्विन गायकवाड आणि कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अभिजित भोसले यांच्यावतीने देण्यात आली.

Comments are closed.

error: Content is protected !!