कोल्हापूर : गेल्या १४ वर्षांपासून रुग्णसेवेचा वसा व वारसा जपणाऱ्या कोल्हापूर कॅन्सर सेंटर-कॅन्सर सेंटर्स ऑफ अमेरिकेचा वर्धापनदिन उत्साहात पार पडला.कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या १४ व्या वर्धापन दिनानिमित्त जीवनानंद या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कॅन्सर रुग्णांचे मनोधैर्य वाढविण्याच्या दृष्टीने कॅन्सरमधून बरे झालेल्या रुग्णांचा मेळावा कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या प्रांगणात झाला.कोल्हापूर कॅन्सर सेंटर-कॅन्सर सेंटर्स ऑफ अमेरिकेचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. सूरज पवार, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर डॉ. रेश्मा पवार यांनी वर्धापन दिनानिमित्त जीवनानंद कार्यक्रमाची कल्पना स्पष्ट करून रुग्ण, नातेवाईक, हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांबरोबर आनंद लुटला.डॉ. सूरज पवार म्हणाले, १४ वर्षांमध्ये पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा येथील ५१ हजारांपेक्षा अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार येथे झाले आहेत. इतकेच नाही तर अत्याधुनिक तंत्रज्ञान, तज्ज्ञ डॉक्टर्स, सुविधा असणारे कोल्हापूर कॅन्सर सेंटर-कॅन्सर सेंटर्स ऑफ अमेरिका हे कोल्हापूरला लाभलेले वरदान आहे. कॅन्सर सेंटर्स ऑफ अमेरिकेशी संलग्नतेमुळे सर्वसामान्य रुग्णांना जागतिक दर्जाच्या कॅन्सर उपचारांचा लाभ घेता येत आहे. त्याचबरोबर कॅन्सर क्षेत्रातील उच्च तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनाचा लाभ रुग्ण घेत आहेत.कॅन्सर मुक्तीच्या दोन दशकांच्या अविरत प्रयासामध्ये रेडिएशन थेरपीमधील सर्वौत्तम तंत्रज्ञानाचा वापर करून, अत्याधुनिक रोबोटिक शस्त्रक्रिया करून ५१ हजार रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले. यामध्ये २७ हजार रुग्णांवर कॅन्सर शस्त्रक्रिया, २२ हजार रुग्णांची केमोथेरपी व १५ हजार रुग्णांवर रेडिएशन थेरपी करण्यात आली आहे.
यावेळी १५ हून अधिक रुग्णांनी उत्स्फूर्त मनोगते व्यक्त केली. कॅन्सरवर उपचार करताना त्यांना आलेले अनुभव त्यांनी कथन केले. याचबरोबर यावर्षीचा एम्प्लॉई ऑफ द इयर २०२५-२६ हा पुरस्कार कोल्हापूर कॅन्सर सेंटर- कॅन्सर सेंटर्स ऑफ अमेरिकेच्या डाॅ. गोमटेश पाटील यांना देण्यात आला. यावेळी डॉ. सूरज पवार, डॉ. रेश्मा पवार, स्मिता राजू, डॉ. योगेश अनाप, डॉ. पराग वाटवे, डॉ. संदीप पाटील, डॉ. किरण बागुल, डाॅ. संजय कुलकर्णी, डॉ. प्रसाद तानवडे, डॉ. नवनाथ ढोणे, डॉ. अश्विनी माने -पाटील, डॉ. चैतन्य पाटील, डॉ. अविनाश आनंद, डॉ. मारोती वडेवाले, डाॅ. पूजा लोंढे, डॉ. काव्या नरपरागर, अनुराधा भोसले, कोल्हापूर कॅन्सर सेंटर- कॅन्सर सेंटर्स ऑफ अमेरिकेचे सर्व डॉक्टर्स, कर्मचारी, रुग्ण व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. रेश्मा पवार यांनी आभार मानले.
