कोल्हापूर : हिंदू धर्म हा भारतीय उपखंडातील सर्वात मोठा आणि महत्वाचा धर्म आहे. या धर्मात अनेक जाती, वर्ण आदी सर्व रूपे एकत्रितपणे सुखाने नांदत आहेत. सर्वांना सामाऊन घेणारा आणि देशाभिमान जपणारा हिंदू धर्म महान असून, देश विघातक विकृती आणि कृत्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी हिंदू धर्मीयांची संघटीत शक्ती जागृत झाली आहे. श्रावण व्रतवैकल्य सारख्या कार्यक्रमांमुळे हिंदू धर्मीयांची एकजूट अधिक शक्तिशाली बनली आहे. संघटीत शक्तीच्या बळावर हिंदू धर्मीय देशविघातक कृत्यांचा समूळ नायनाट करतील. आजच्या पाश्च्यात्य संस्कृतीच्या वाढत्या प्रभावामध्ये समृद्ध हिंदू संस्कृती आणि धार्मिक परंपरा टिकवून ठेवणे आवश्यक असून, येणाऱ्या पिठीवर सुसंस्कार करण्यासाठी हिंदू धर्म शिक्षण वर्गांचे आयोजन आगामी काळात करण्यात येईल, असा विश्वास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला.
कोल्हापुरातील समस्त हिंदुत्ववादी संघटना व आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशनच्या वतीने हिंदू धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्यानिमित्त श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी नष्टे लॉन, कोल्हापूर येथे “श्रावण व्रत वैकल्य” या सामुदायिक उपवास सोडण्याच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या माजी कोषाध्यक्ष सौ. वैशाली क्षीरसागर, नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर, नगरसेविका मंगल साळोखे, नगरसेविका वंदना मोहिते, युवानेते पुष्कराज क्षीरसागर, नगरसेवक प्रसाद चव्हाण, यादव महाराज, सुधीर जोशी वंदूरकर, बाबा वाघापुरकर, परिवहन सदस्य रोहन अतिग्रे, कमलाकर किलकीले, उदय भोसले, चंद्रकांत बराले, शिवाजी जाधव, किशोर घाटगे, कमलाकर जगदाळे, अर्जुन आंबी, मधुकर नाझरे आदी हिंदुत्ववादी संघटनाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
