कोल्हापूर: केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी घेतलेल्या स्पष्ट आणि रोखठोक पत्रकार परिषदेमुळे निवडणूक आयोगाच्या कामकाजाबाबत आणि मतदार याद्यांबाबत निर्माण केल्या गेलेल्या अनेक गैरसमजांना पूर्णविराम मिळाला आहे. राजकीय स्वार्थासाठी आणि पराभवाचे खापर फोडण्यासाठी संविधानाचे पुस्तक हातात घेऊन त्याच संविधानाने निर्माण केलेल्या संस्थांवर अविश्वास निर्माण करण्याचे प्रकार आता थांबले पाहिजेत. या अनुषंगाने आज भाजपा कार्यालय येथे पत्रकार परिषद घेऊन खासदार धनंजय महाडिक यांनी भूमिका स्पष्ट केली.
आयोगात पूर्ण एकमत असून SIR सह सर्व निर्णय तिन्ही आयुक्तांच्या एकमताने झाले आहेत. कोणताही अंतर्गत संघर्ष नाही.सर्वोच्च न्यायालयाची मोहर या प्रक्रियेवर उमटली आहे. बिहार SIR प्रक्रियेला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता देण्यात आली असून मतदार याद्या सुधारणे कायदेशीर व आवश्यक आहे.कॅबिनेट सेक्रेटरींना दिलेले पत्र हे डेप्युटेशनबाबतचे प्रशासकीय पत्र होते, धोरणात्मक मतभेदाचे नाही.फॉर्म सहाबाबत संभ्रम नसावा मतदार नोंदणी व दस्तऐवजांबाबत आयोगाला कायदेशीर अधिकार असल्याचे स्पष्ट केले. दुटप्पी भूमिका थांबवा: जिंकलो की प्रणाली योग्य आणि हारलो की आयोग दोषी हा विरोधी पक्षांचा ‘रडीचा डाव’ थांबला पाहिजे.आरोपांपेक्षा पुरावे द्या: ‘व्होटचोरी’सारख्या गंभीर आरोपांवर पत्रकार परिषदांऐवजी जनतेसमोर ठोस पुरावे मांडण्याचे आव्हान केले.मतदार यादी तपासणे ही Booth Level Agents (BLA) चीही जबाबदारी आहे.संविधानावर विश्वास असेल, तर संविधानाने निर्माण केलेल्या संस्थांवर आणि जनतेच्या जनादेशावर विश्वास ठेवायलाच हवा, अशी भूमिका या पत्रकार परिषदेमध्ये मांडली.यावेळी आमदार अमल महाडिक, महापौर रूपाराणी निकम, तानाजी पाटील, महेश जाधव, नाथाजी पाटील, राजवर्धन निंबाळकर, मुरलीधर जाधव, विशाल शिराळे, राहुल चिकोडे उपस्थि
त होते.
