बीयॉन्‍ड पिंक: हिमालयीन रॉक सॉल्टला वेगळे ठरवणाऱ्या बाबी

 

रॉक सॉल्ट (सेंधव मीठ) फार पूर्वीपासून भारतीय परंपरेचा भाग राहिले आहे. आयुर्वेदात नैसर्गिक गुणधर्मांसाठी त्याला विशेष महत्त्व दिले गेले आहे. अलिकडच्या काळात, ग्राहक आपल्या आहाराबाबत अधिक जागरूक झाल्यामुळे दैनंदिन स्वयंपाकात रॉक सॉल्टचा वापर लक्षणीयरित्या वाढला आहे. संतुलित आणि सजग जीवनशैलीशी सुसंगत नैसर्गिक, कमी प्रक्रिया केलेल्या घटकांना मिळणारी वाढती पसंती यातून दिसून येते. आज बाजारपेठेत अनेक पर्याय उपलब्ध असल्याने एका विश्वासार्ह ब्रँडकडून योग्य पर्याय मिळवणे अत्यंत आवश्यक ठरते.भारतातील पहिल्या क्रमांकाचे रॉक सॉल्ट ‘टाटा सॉल्ट हिमालयन रॉक सॉल्ट’ या पसंतीची सांगड टाटा ब्रँडच्या विश्वासाशी आणि गुणवत्तेच्या खात्रीशी घालते. यामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांसारखी नैसर्गिक खनिजे अल्प प्रमाणात असतात, आणि हीच खनिजे या मिठाला त्याचे वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म प्रदान करतात.रॉक सॉल्टमध्ये असलेल्या खनिजांमुळे ते नैसर्गिकरित्या वेगवेगळ्या रंगांमध्ये आढळते. पाण्यात विरघळवून गाळणीतून गाळल्यास या मिठाचे स्वच्छ द्रावण तयार होते, तर विरघळू न शकणारे रंगीत कण गाळणीवर शिल्लक राहतात, जे नैसर्गिकरित्या आढळणारी खनिजे असतात.टाटा सॉल्ट हिमालयन रॉक सॉल्टच्या नुकतेच झालेल्या प्रयोगशाळा तपासणीत स्पष्ट झाले आहे की, ते लागू असलेल्या सर्व गुणवत्ता आणि सुरक्षितता मानकांचे पूर्णपणे पालन करते, तसेच यामध्ये कोणत्याही कृत्रिम अन्न रंगांचा अभाव असल्याचे निष्पन्न झाले आहे, ज्यामुळे ग्राहकांसाठी या उत्पादनाच्या शुद्धतेची खात्री मिळते.स्वयंपाक करताना वापरायचे असो किंवा पदार्थ तयार झाल्यावर वरून भुरभुरण्यासाठी असो, टाटा सॉल्ट हिमालयन रॉक सॉल्ट प्रत्येक चिमूटभर मिठातून पदार्थांना एक वेगळी चव देते, आणि त्यासोबत प्रस्थापित, विश्वासार्ह गुणवत्ता आणि नैसर्गिक खनिजेही ग्राहकांना मिळवून देते.

Comments are closed.

error: Content is protected !!