कोल्हापूर : शाहूपुरी व्यापारी पेठेतील वि. स. खांडेकर प्रशालेजवळील अधिकृत रेल्वे रिझर्वेशन सेंटर (यात्री तिकीट सुविधा केंद्र)च्या स्थलांतरित व नूतनीकरण केलेल्या कार्यालयाचे उद्घाटन आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले. प्रवाशांच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन आधुनिक पद्धतीने विकसित करण्यात आलेले हे केंद्र आता कार्यान्वित झाले आहे.हे केंद्र कुशल टूर्स अँड ट्रॅव्हल्स या फर्मच्या माध्यमातून कार्यरत असून, उमेश शहा हे संचालक आहेत. गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ या केंद्रामार्फत प्रवाशांना आरक्षणासह विविध प्रवासी सेवा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या व्यवसायाला आधुनिक स्वरूप देण्यासाठी उमेश शहा यांचे सुपुत्र कौस्तुभ शहा हे बॅचलर्स ऑफ इंजिनिअरिंग (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) पदवीधर असून, नव्या संकल्पना आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या उपक्रमात सक्रिय सहभाग घेत आहेत.केंद्रामध्ये रेल्वेच्या विविध श्रेणींचे आरक्षण, ई-रेल्वे तिकीट, लक्झरी बस, रेडबस तसेच विमानसेवेचे बुकिंग करून दिले जाते. याशिवाय हॉटेल बुकिंग आणि मनी एक्स्चेंजची सुविधाही उपलब्ध आहे.तसेच आयआरसीटीसी टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून देशांतर्गत तसेच परदेशातील विविध पर्यटनस्थळांसाठी टूर पॅकेज आणि प्रवासाचे नियोजन करता येते. शालेय व शैक्षणिक सहली, समूह सहली, कुटुंबीय तसेच इतर प्रवाशांसाठी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय टूर बुकिंगची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.केंद्राच्या आसपासच्या परिसरातील प्रवाशांसाठी तिकीट घरपोच देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच मोबाईलवरूनही बुकिंग स्वीकारले जाणार असल्याने प्रवाशांना रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही.रेल्वे प्रवासी समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी यांनी कोल्हापूरच्या आगामी वीस वर्षांची गरज लक्षात घेऊन वाहतूक आणि पर्यटनाच्या दृष्टीने नियोजन करण्याची आवश्यकता व्यक्त केली. स्थानिक पातळीवर वाहतूक, निवास आणि आदरातिथ्याच्या सुविधा विकसित झाल्यास कोल्हापूरच्या पर्यटनाला अधिक चालना मिळेल, असे त्यांनी नमूद केले.प्रवासी वर्गाचे आरक्षण करून देण्याबरोबरच त्यांचा बहुमूल्य वेळ आणि पैसा वाचेल, तसेच त्यांना योग्य मार्गदर्शन मिळेल यासाठी शहा परिवाराने प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त करत आमदार अमल महाडिक यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.यावेळी स्टेशन मास्टर विजय पोद्दार, मुंबई विभागीय रेल्वे प्रवासी समितीचे सदस्य बाबासाहेब निंबाळकर, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेट्टी सुजय शेटे क्रिडाई चे सुजय होसमाने बीडीओ मिलिंद टोणपे, कोठारी तसेच इतर मान्यवरांनीही केंद्राला शुभेच्छा दिल्या.प्रवाशांच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन आरक्षणासोबतच विविध प्रवासी आणि पर्यटन सेवा एकाच छताखालीउपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याची माहिती कुशल टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे संचालक उमेश शहा यांनी दिली.
