एसआयआर विरोधावरून प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आक्रमक

 

मुंबई:  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत एसआयआर प्रक्रियेवर मांडलेल्या भूमिकेचा व्हिडिओ शेअर करत भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी ठाकरे बंधूंच्या ‘गर्जना मोर्चा’वर जोरदार पलटवार केला आहे. एसआयआर प्रक्रियेला विरोध करणाऱ्या राजकीय नेत्यांना आणि पक्षांना त्यांनी थेट सवाल केले आहेत.गृहमंत्र्यांचे संसदेतील मुद्दे अधोरेखित करत प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे विरोधकांना खालील सवाल विचारले:देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री कोण असावे, हे घुसखोरांनी ठरवायचे का ? तसे झाले तर लोकशाही सुरक्षित राहील का ?एका मतदाराला एकापेक्षा अधिक ठिकाणी मतदान करण्याची मुभा असावी का ?मृत्यू पावलेल्या नागरिकांना मतदार यादीत स्थान असावे का ?एसआयआर प्रक्रियेला विरोध करणाऱ्यांनी आधी या प्रश्नांची उत्तरे द्यावीत आणि नंतरच विरोध करावा, असे थेट आवाहन रविंद्र चव्हाण यांनी या वेळी केले.

 

 

Comments are closed.

error: Content is protected !!