राजर्षी शाहु शेतकरी समविचारी आघाडीचा प्रचार शुभारंभ सोहळा

 

राजर्षी शाहु शेतकरी समविचारी आघाडीचा प्रचार शुभारंभ सोहळा

कोल्हापूर: गोकुळचे शिल्पकार स्वर्गीय आनंदराव पाटील- चुयेकर यांच्या चुये (करवीर) येथील स्मृतीस्थळाला अभिवादन करून राजर्षी शाहु शेतकरी समविचारी आघाडीच्या प्रचार शुभारंभ सोहळा पार पडला. या सोहळ्याला माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह उपस्थित राहीलो. कोल्हापूरचे शेतकरी आणि ठरावधारक प्रामाणिक व स्वाभिमानी असल्याने ते कोणच्याही भुलथापांना बळी पडणार नाहीत. येत्या १८ तारखेला ते ‘शिट्टी’ या चिन्हासमोर शिक्का मारून राजर्षी शाहू शेतकरी आघाडीला मतदान करतील, असा विश्वास व्यक्त करताना साडेपाच लाख शेतकरी आणि दूध उत्पादकांच्या भविष्याच्या दृष्टीने समविचारी आघाडीच्या पाठीशी ठामपणे उभे राहा, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी यावेळी केले.

यावेळी माजी आमदार बजरंग देसाई, सत्यजित पाटील- सरूडकर, राजूबाबा आवळे, राजीव किसनराव आवळे, गटनेते एकनाथ पाटील, राजू लाटकर, विजयराव देवणे, सत्यजित जाधव, हिंदुराव चौगले, शामराव देसाई, पी. डी. धुंदरे, ए. डी. पाटील, एम. आर. पाटील, सदाशिव चरापले, श्रीमती उदयानी साळुंखे, सौ. स्मिता गवळी, उमेश भोईटे, भिकाजी एकल, रणजीत पाटील, विश्वनाथ पाटील, रामराजे कुपेकर, सुभाष वाडकर, एस. के. पाटील, बबन रानगे, शशिकांत खवरे, कॉ. सम्राट मोरे, गणपतराव डोंगरे, निवास पाटील, भगवानराव जाधव, संभाजीराव देसाई, अमर पाटील- शिंगणापूरकर, प्रकाश पाटील, मोहन धुंदरे, दिग्विजय कुराडे, प्रशांत देसाई, पांडुरंग भांदिगरे, जीवन पाटील, श्रीपती पाटील, एस. बी. पाटील, आर. एस. कांबळे, डी.एस. पाटील, विश्वास दिंडोर्ले, सखाराम चव्हाण, संग्राम पाटील, विश्वनाथ पाटील, सागर धुंदरे, संभाजीराव पाटणकर, सभापती सागर पाटील, सभापती छाया देसाई, दत्तात्रय वारके, सुयोग वाडकर, निवास पाटील, मधुकर रामाणे, डॉ. के. एन. पाटील, बाजीराव पाटील, पांडुरंग पाटील, कृष्णा पाटील, सागर कोंडेकर, एकनाथ पाटील, विष्णुपंत एकशिंगे, हिंदुराव पाटील यांच्यासह समविचारी आघाडीचे सर्व उमेदवार, जिल्हाभरातील ठरावधारक आणि दूध उत्पादक उपस्थित होते.

 

Comments are closed.

error: Content is protected !!