
कोल्हापूर: कोल्हापुरातील जालनावाला स्पोर्टस् ट्रेनिंग आणि रिसर्च सेंटरच्या विद्यार्थ्यांनी सातव्या मैत्री चषक तायक्वांदो चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये 34 पदकासह तिसऱ्या विजेतेपदाची ट्रॉफी मिळवली.मुंबईतील येथील कनोसा कॉनवेन्ट स्कूलमध्ये या स्पर्धा पार पडल्या. यामध्ये जालनावाला स्पोर्टच्या खेळाडूंनी 10 सुवर्ण, 11 रौप्य, 13 कास्य पदकासह तिसऱ्या पदाची ट्रॉफी मिळवली. यातील सुवर्ण पदक विजेते खेळाडू रिया पाटील, जयनब मोमीन, मोहम्मदसाद मोमीन, ध्येय वस्सा, रोहन पिसाळ, जान्हवी माने, हीना शेख, ऋतुराज माने, रोहीत खुडे, सूरज रजपूत, अनन्या चौगुले, श्रीया गाताडे, नील भोसले, आदित्य चव्हाण, श्रेयष पाटील, जयवर्धन शर्मा, यश्वी वसा, गौरव पाटील, प्रीत सोळंकी, रोहीत पाटील, शुभम भनवालकर, गार्गी कणसे, सानवी पटेल, भुमी पटेल, अभिमान भोसले, श्रनाथ बकरे, राजवर्धन चेंडके, आशा कांबळे, रूद्र गाताडे, श्रेयश स्वामी, राजलक्ष्मी अवघडे, ऋतुजा गायकवाड, चिन्मय चव्हाण, ऋषिकेश इटगी यांचा समावेश आहे. यांना प्रशिक्षक अमोल भोसले यांचे प्रशिक्षण लाभले तर निलेश जालनावाला यांचे मार्गदर्शन लाभले.
Leave a Reply