
कोल्हापूर : रुचकर पण पौष्टिक खाद्य संस्कृतीची कोल्हापूरला परंपरा आहेच. यातच भर घालण्यासाठी कोल्हापूरातील अगदी मध्यवस्तीत हॉटेल खासबागच्या दारात अंजली टॉप ३ शॉपीची सुरुवात झाली आहे. या शॉपमध्ये सुप्रसिद्ध ऐनापुरचे मामा पेढे, पौष्टिक, चविष्ठ शुद्ध तुपातील ड्रायफुट डिंक लाडू, जयसिंगपूरचे प्रसिद्ध श्री जय आंबा भडंग हे पदार्थ विक्रीसाठी ठेवले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात या ऐनापुरच्या मामा पेढ्यांची ख्याती आहे. हे पेढे आता कोल्हापुरातील अंजली टॉप ३ येथे कोल्हापूरकरांसाठी उपलब्ध आहेत असे अंजली शॉपीचे मालक आनंद मेटर यांनी सांगितले. याच बरोबर कोल्हापूरला कुस्तीची मोठी परंपरा लाभली आहे. खास पैलवानांच्यासाठी इथे ९ पौष्टिक पदार्थ यात डिंक, शुद्ध तूप, काजू, बदाम, खारीक,गूळ, खसखस, खोबरे व हाळीव एकत्रित करून बनविलेले डिंक लाडू उपलब्ध केले आहेत. तसेच गरोदर स्त्रियांच्या साठी १३ पौष्टिक पदार्थ एकत्रित करून बनवलेले घरगुती डिंक लाडू उपलब्ध केले आहेत. जयसिंगपूरचे खास रुचकर, खमंग, खुसखुशीत प्रसिद्ध आंबा भडंग देखील आहे. ऐनापुरचे मामा पेढे हे सेंद्रिय चारा देऊन हरियाणाच्या प्रसिद्ध मुरा म्हशीच्या दुधापासून बनवलेले आहेत. हे तिन्ही खाद्यपदार्थ एकाच ठिकाणी मिळणे म्हणजे खवयांच्यासाठी त्रिवेणी संगमच म्हणावा लागेल. मुलांचा खाऊचा डब्बा, भिशी मंडळ, छोट्या मोठ्या पार्टीसाठी एक परिपूर्ण पॅकेज असणाऱ्या या शॉपमध्ये सर्व पदार्थ परवडतील अश्या पॅकेट्समध्ये उपलब्ध आहेत. कोल्हापूरच्या खवय्येगिरित आणखी या पदार्थांची भर टाकणाऱ्या अंजली टॉप ३ शॉपीला चोखंदळ कोल्हापूरकरांनी अवश्य भेट द्या !
Leave a Reply