
जोधपूर : स्वयंमघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम बापू याला आज जोधपुर सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली तसेच साथीदार शिल्पी व शरद यांनी २० वर्ष शिक्षा सुनावली. जोधपूर न्यायालयाचे न्यायाधीश मधुसुदन शर्मा यांनी यांनी निकाल दिला. अत्याचारग्रस्त मुलीचे वडील आणि इतर कुटुंबीय सदस्यांनी अखेर न्याय मिळाल्याची भावना व्यक्त करत अजूनही आम्हाला न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचे सांगितले. राजस्थान उच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार, जोधपूर विशेष न्यायालय मध्यवर्ती कारागृहाच्या भागातच हा निकाल देण्यात आला.
Leave a Reply