
इचलकरंजी: केटीएम या युरोपातील दिग्गज अशा रेसिंग ब्रॅन्ड तर्फे इचलकरंजी येथे आकर्षक केटीएम स्टंट शो चे आयोजन केले होते. या शो चे आयोजन व्यावसायिक अशा स्टंट कलाकारांकडून लोकांना चांगले स्टंट्स पहायला मिळावेत या उद्देशाने करण्यात आले होते. या स्टंट शो चे आयोजन फॉर्च्युन प्लाझा मॉल,सांगली रोड,इचलकरंजी येथे करण्यात आले होते.यामध्ये व्यावसायिक अशा स्टंट टिम तर्फे श्वास रोखून धरणाऱ्या स्टंट्सने आपली कला ही केटीएम ड्यूक बाईक्सच्या माध्यमातून दाखवली.
बजाज ऑटो लिमिटेडच्या प्रो बायकिंग चे प्रेसिंडेंट अमित नंदी यांनी सांगितले ‘‘केटीएम हा ब्रॅन्ड हाय परफॉर्मन्स रेसिंग बाईक म्हणून प्रसिध्द आहे म्हणून आम्ही आमच्या ग्राहकांना नेहमीच केटीएम बाईक देत असलेल्या साहस आणि उत्साहाचा अनुभव आमच्या ग्राहकांना उपलब्ध करून देत आहोत.व्यावसायिक स्टंट्स चे हे कार्यक्रम विविध शहरांत होणार असून भविष्यातही अशा प्रकारचे उपक्रम आम्ही मोठ्या प्रमाणावर आयोजित करणार आहोत. केटीएम हा एक्सक्लूझिव्ह असा प्रिमियम ब्रॅन्ड असून यामुळे आम्ही आमच्या ग्राहकांना अनोखा केटीएम अनुभव देण्यास उत्सुक आहोत.’’
हा कार्यक्रम शहरांतील लोकांसाठी खुला आहे. आजपर्यंत अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन राजकोट, अहमदाबाद,कांचीपुरम,कोईम्बतूर,चेन्नई, विजयापूर, लखनौ, इंदूर, जबलपूर,औरंगाबाद,धुळे, जळगाव,कोल्हापूर, नागपूर,सातारा,लातूर,नाशिक आणि अशा अन्य कित्येक शहरांत करण्यात आले आहे.केटीएमच्या चाहत्यांना बाईक्स या केटीएम ऑटो इंडिया–राजाराम रोड, टाकाळा, कोल्हापूर महाराष्ट्र. येथे खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
Leave a Reply