कोल्हापूर : गेल्या काही आठवड्यापासून बाजार मंदावल्यामुळे गुंतवणूकदारांनी एक ठोस निर्णय घेणे अपेक्षित आहे. फेब्रुवारीच्या शेवटी सेन्सेक्स १२०० अंकांनी खाली आल्यामुळे बाजारपेठेतील सर्व डेरिव्हेटिव्ह्जला तडा जात आहेत. काही गुंतवणूकदार बाजारपेठेतून बाहेर पडले, परंतु त्यांच्या इक्विटीच्या संपुर्ण विलीनीकरणामुळे काही जण सुरक्षित मार्ग शोधत आहेत.
म्हणून,अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी जेथे पैसे सुरक्षित आहेत असे सुरक्षित स्थान शोधणे महत्त्वाचे आहे जेणेकरून योग्य वेळी पुनर्गुंतवणुकीसाठी पैसे काढता येऊ शकतात.तसेच गुंतवणूकदार तेथेच पैसे गुंतवणूक करू इच्छितात जिथे सुनिश्चित व्याज दराने परतावा मिळेल.
बजाज फायनान्स लिमिटेड आपल्या नियमित ग्राहकांना ७.८५% तर ज्येष्ठ नागरिकांना ८.२०% व्याजदराप्रमाणे मुदत ठेवी देऊ करत असून,आयसीआरएच्या एमएएएए (स्थिर) रेटिंग आणि क्रिसिलच्या एफएएए / स्टेबल रेटींगसह, बजाज फायनांस लिमिटेड, सुरक्षेच्या आणि व्याज वेळेवर भरणा करण्याच्या संदर्भात सर्वोच्च दर्जाचे मानले गेले आहे. ग्राहक बजाज फायनांस लिमिटेडमध्ये १२ ते ६० महिने दरम्यानच्या कालावधीत किमान २५,००० पासून फिक्स डिपॉझिट करू शकतो.
बजाज फायनान्समध्ये मुदत ठेवीचे फायदे खालील प्रमाणे आहे.स्थिर परतावा,मार्केटच्या चढ-उताराचा कुठलाही परिणाम न होता,मुदत ठेवीसह,गुंतवणूकदार गुंतवणुकीवर स्थिर व्याज मिळविण्याची आशा करू शकतात,ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत फायदेशीर,अतिरिक्त व्याजदराने, ज्येष्ठ नागरिक मुदत ठेवींवर अधिक व्याजदर मिळवू शकतात,अस्थिरता नाही,मुदत ठेवी आधी ठरवलेल्या व्याज दराने बांधले जातात.गुंतवणूकदाराला शेवटपर्यंत ठरलेल्या व्याजदराप्रमाणेच रक्कम मिळेल,स्टॉक मार्केट कसे कार्य करते हे महत्त्वाचे नाही.त्यामुळे ही एफडी सर्वात सुरक्षित गुंतवणुकीच्या पर्यायांपैकी एक आहे.

Leave a Reply