
कोल्हापूर : भारताच्या स्वातंत्र्य पूर्व काळातील कोकणातल्या एका गावातील सायकल चोरीची हलकीफुलकी कथा असणारा ‘सायकल’ चित्रपट येत्या 4 मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. व्हायकॉम 18 प्रस्तुत व प्रकाश कुंटे दिग्दर्शित सायकल ही एक भाबड्या जगात चक्कर मारणारी कथा आहे. चित्रपटात भाऊ कदम, प्रियदर्शन जाधव, ऋषीकेश जोशी, दीप्ती लेले, मैथिल पटवर्धन आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. कथा अदिती मोघे यांची आहे.
सायकलवर अतिशय प्रेम असलेल्या केशवची सायकल चोरी झाल्यावर त्यानंतर घडणारी गोष्ट यात दाखवण्यात आली आहे.
Leave a Reply